Explore

Search

April 13, 2025 10:37 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Pune Thane Metro : पुणे आणि ठाणे शहरात मेट्रोचे जाळे अजून घट्ट आणि गतिमान करण्यात येणार

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्रात निवडणुकीची घोषणा केलेली नाही. पण विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने महाराष्ट्रातील पुणे आणि ठाण्यातील जनतेसाठी मोठी घोषणा केली आहे. या शहरात मेट्रोचे जाळे अजून घट्ट आणि गतिमान करण्यात येणार आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या दोन शहरांसह बेंगळुरु येथील मेट्रोसाठी पण भरीव तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी या तीन शहरांच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी 30 हजार कोटी रुपयांच्या खर्चाला मंजूरी दिली.

पाच वर्षात नवीन भागात मेट्रो धावणार :

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माध्यमांशी बोलताना याप्रकल्पाची माहिती दिली. त्यानुसार, या तीन शहरात हे प्रकल्प राबविण्यात येतील. 2029 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. या मेट्रोल प्रकल्पासह आर्थिक संबंधीत कॅबिनेट समितीने बागडगोरा विमानतळ (पश्चिम बंगाल) आणि बिहटा (बिहार) मधये दोन नवीन एन्क्लेव्ह विकासाला मंजूरी दिली आहे. 2014 पूर्वी देशातील केवळ पाच शहरात मेट्रो रेल्वे होती. आता 21 शहरात मेट्रो सुविधा देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात 2 लाख कोटी रुपयांहून अधिक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सला मंजूरी दिल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

ठाण्यात नवीन 22 स्टेशन :

ठाण्यात नवीन 29 किलोमीटर लांब मेट्रो रेल्वे सेवा सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये नवीन 22 स्टेशन असतील. शहरातील पश्चिम भागातील नागरिकांना शहरातील इतर भागासाठी जोडण्यात येईल. या नेटवर्कमध्ये एका बाजूला उल्हास नदी तरी दुसऱ्या बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असेल. या प्रकल्पासाठी 12,200 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे.

या प्रकल्पासाठी इनोव्हेटिव्ह फायनान्सद्वारे निधी जमा करण्यात येणार आहे. स्टेशनचे नाव, कॉर्पोरेट ॲक्सेस राइट्स, ॲसेट्स मॉनेटायझेशन आणि इतर स्त्रोताच्या माध्यमातून मेट्रोसाठी फंडिंग करण्यात येणार आहे.

पुणे मेट्रोसाठी इतका खर्च :

पुण्यात नवीन मार्गावर मेट्रो धावेल. त्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे. त्यासाठी 2,954.53 खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प पुणे मेट्रो फेज 1 चा विस्तारीत प्रकल्प असेल. त्याची लांबी 5.46 किमी पर्यंत असेल. यामध्ये तीन भूमिगत स्टेशन असतील. मार्केट यार्ड, बिबवेवाडी, बालाजी नगर आणि कटराज या मुख्य भागांना ही मेट्रो जोडणार आहे. पुणेकरांना वाहतूक कोंडीतून सूटका करण्यासाठी, सहज आणि गतिमान प्रवाशासाठी हा नवीन पर्याय असेल.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy