Explore

Search

April 13, 2025 10:35 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara DCC Bank Recruitment 2024 : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत ३२३ जागांसाठी भरती

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड येथे ३२३ रिक्त पदांसाठी भरती सुरू आहे. या भरतीतून कनिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ शिपाई या पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या भरतीत वय वर्ष १८ ते ३८ वर्षे वयोगटातील उमेदवार सहभाग घेऊ शकतात. इच्छुक उमेदवारांनी २१ ऑगस्ट २०२४ पर्यंत त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने जमा करणे आवश्यक आहे.

सातारा येथील डीसीसी बँक म्हणजेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड येथे विविध पदांच्या अनेक जागा रिक्त आहेत. सातारा डीसीसी बँकेत एकूण ३२३ जागा रिक्त आहेत. या रिक्त जागी योग्य उमेदवारांची नियुक्ती करण्यासाठी सातारा डीसीसी बँकेतर्फे भरती जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने दिनांक २१ ऑगस्ट २०२४ पर्यंत जमा करणे आवश्यक आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कनिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ शिपाई या पदांच्या एकूण ३२३ जागा रिक्त आहेत. या भरतीत नेमणूक झाल्यानंतर उमेदवार सातारा येथे कार्यरत राहील. या भरतीत वय वर्ष १८ ते ३८ वर्षे वयोगटातील उमेदवार सहभाग घेऊ शकतात.

पद आणि त्यानुसार रिक्त जागा

  • कनिष्ठ लिपिक – २६३ रिक्त जागा
  • कनिष्ठ शिपाई – ६० रिक्त जागा

कनिष्ठ लिपिक

  • कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक
  • वाणिज्य शाखेतील पदवीधर असल्यास प्राधान्य
  • MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक
  • मराठी आणि इंग्रजी टायपिंग येणे आवश्यक.
  • लघुलेखनाची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
  • बँकिंग क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

कनिष्ठ शिपाई

  • दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक.
  • इंग्रजी भाषेचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक.
  • संगणकाचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक.

सातारा डीसीसी बँकेत सुरू असलेल्या या भरतीत उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून सहभागी होऊ शकतात. अर्ज प्रक्रिया दिनांक १२ ऑगस्ट २०२४ पासून सुरू होईल. २१ ऑगस्ट २०२४ ही अर्ज प्रक्रियेतील शेवटची तारीख असेल. यानंतर जमा केले गेलेले अर्ज या भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जाणार नाहीत. या अर्ज प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना ५९०/- अर्ज शुल्क भरावे लागेल. अर्ज सादर करते वेळीच हे अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे. अर्ज सादर केल्यानंतर पुढे ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेसाठीचे प्रवेश पत्र आणि परीक्षेचे वेळापत्रक हे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड च्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले जाईल.

या परीक्षेतील गुण आणि सर्व कागदपत्रांची पडताळणी करून पात्र उमेदवारांची निवड मुलाखत फेरीसाठी केली जाईल. या मुलाखत फेरीतून त्या त्या पदांवर योग्य त्या उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. या भरती विषयी सविस्तर माहिती सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड च्या https://www.sataradccb.in/ या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy