Explore

Search

April 8, 2025 6:40 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Kalki 2898 AD : तब्बल 1000 कोटी रुपये कमावणारा ‘कल्की 2898 एडी’ ओटीटीवर

कुठे अन् कधी पाहता येणार?

जगभरात 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गल्ला जमवलेला ‘कल्की 2898 एडी’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट एक नाही तर दोन विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर स्ट्रीम होणार आहे.

नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइम अशा दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर ‘कल्की 2898 एडी’ हा चित्रपच वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्सवर येत्या 22 ऑगस्ट रोजी या चित्रपटाचा हिंदी व्हर्जन स्ट्रीम होणार आहे. तर तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमधील व्हर्जनसुद्धा त्याच दिवशी अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

रविवारी प्राइम व्हिडीओने चित्रपटाचा पोस्टर शेअर करत याबद्दलची माहिती दिली. त्याचवेळी नेटफ्लिक्सनेही चित्रपटाचा प्रोमो शेअर करत स्ट्रिमिंगची तारीख जाहीर केली. या ‘साय-फाय’ चित्रपटाने जगभरात तब्बल 1000 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती.

27 जून 2024 रोजी हा चित्रपट विविध भाषांमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. Sacnilk.com ने दिलेल्या माहितीनुसार ‘कल्की 2898 एडी’ने जवळपास 1041.6 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

नाग अश्विनने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून त्याच मोठमोठ्या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. नाग अश्विन यांनी याआधी ‘महानटी’ आणि ‘येवडे सुब्रमण्यम’ यांसारख्या सुपरहिट तेलुगू चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं.

सुरुवातीला या चित्रपटाचं नाव ‘प्रोजेक्ट के’ असं ठेवण्यात आलं होतं. मात्र नंतर त्याचं नाव बदलून ‘कल्की 2898 एडी’ असं ठेवलं. यामध्ये प्रभास, दीपिका पादुकोण, अमिताभ बच्चन, कमल हासन, दिशा पटानी, शोभना, शाश्वता चॅटर्जी यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये प्रदर्शित झाला.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy