Explore

Search

April 12, 2025 8:46 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Israel : लेबनानमधून इस्रायलवर भीषण हल्ला

इस्रायल : इस्रायल आणि लेबनान सीमेवर अत्यंत तणावपूर्ण स्थिती आहे. इस्रायलच्या उत्तरेला सतत एयर सायरन वाजत आहे. लेबनानमधून इस्रायलच्या उत्तर सीमेवर मोठ्या प्रमाणात ड्रोन्स डागण्यात आले. इस्रायली सैन्याने याची पुष्टी केली आहे. या ड्रोन हल्ल्यामुळे इस्रायलच्या उत्तरेला असलेल्या शहरात सतत अलार्म वाजत आहे. लेबनानामधून उत्तर इस्रायलयमध्ये जवळपास 40 रॉकेट आणि अनेक ड्रोन्स डागण्यात आले. इस्रायल डिफेन्स फोर्सने ही माहिती दिली. गॅलिली, पॅनहँडल आणि गोलान हाइट्समध्ये हा ड्रोन हल्ला करण्यात आला अशी माहिती इस्रायल डिफेन्स फोर्सने दिली. काही ड्रोन्स पाडण्यात आली, तर काही ड्रोन्स लक्ष्यभेद करण्यात यशस्वी ठरली.

लेबनानमधून उत्तर इस्रायलमध्ये आतापर्यंत 115 रॉकेटस डागण्यात आले आहेत. दक्षिण लेबनानच्या मतमोरा येथे एका इमारतीवर इस्रायलक़डून हल्ला करण्यात आला. हिजबुल्लाहचे अनेक दहशतवादी या इमारतीत दिसले होते. सोबतच या भागातील आणखी एका इमारतीवर हल्ला करण्यात आला. अलार्म सायरन वाजल्यानंतर इस्रायल डिफेंस फोर्सने लोकांना आपल्या घरातच सेफ हाऊसमध्ये रहायला सांगितलं. हिजबुल्लाह आणि इस्रयालमध्ये प्रचंड तणाव असल्याच हे लक्षण आहे.

अमेरिकेने काय म्हटलय?

इस्रायल आणि हिजबुल्लाहमध्ये मागच्या काही दिवसांपासून अनेक छोटे-मोठे संघर्ष सुरु आहेत. इस्रायलने हिजबुल्लाहच्या तीन सदस्यांना आर्टिलरी हल्ल्यात मारलं. त्याच उत्तर हिजबुल्लाहने इस्रायली सैन्यावर एंटी-टँक मिसाइल हल्ल्याने दिलं. सीमेवर स्थिती किती गंभीर बनलीय हे अशा घटनांमधून दिसून येतं. मर्यादीत स्वरुपात सुरु असलेला हा संघर्ष मोठ्या युद्धामध्ये बदलू शकतो. अमेरिकेने या स्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. इस्रायल आणि लेबनान सीमेवर घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीवर लक्ष असल्याच अमेरिकेने म्हटलं आहे. स्थिती बघडली, तर क्षेत्रीय स्थिरतेवर याचा परिणाम होईल.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy