Explore

Search

April 15, 2025 9:16 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : पाटण तालुक्यातील वाझोली-डाकेवाडी रस्त्यावर दरडी कोसळल्या

ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

पाटण : पाटण तालुक्यातील काळगाव खोऱ्यातील अनेक दुर्गम गावांना जोडणाऱ्या वाझोली-डाकेवाडी दरम्यानच्या रस्त्यावर जोराच्या पावसामुळे रस्त्यावर सतत दरडी कोसळत आहेत. पावसाच्या पाण्यामुळे दरडीबरोबरच पाण्याच्या प्रवाहामुळे डोंगरातून मोठे दगडही वाहून रस्त्यावर येत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

वाझोली गावाजवळच्या डोंगरावर मोठमोठे दगड आहेत. डोंगरावरील हे दगड कधीही गावावर कोसळतील, अशी स्थिती निर्माण झाली आहे. या परिसरातील लोक भयभीत झाले आहेत. विभागाला दोन दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात पावसाने झोडपून काढले होते. कमी वेळामध्ये जोरदार पाऊस झाल्याने नदी नाले आणि ओढ्याच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे.

अनेक दुर्गम डोंगराळ गावांना जोडणाऱ्या वाझोली, डाकेवाडी दरम्यानच्या रस्त्यावर कुमकवत झालेल्या दरडी पावसामुळे कोसळत आहेत. डोंगराचा भाग गावाच्या खाली असल्याने डोंगरातून पाण्याच्या प्रवाहामुळे दरडीबरोबरच इतर दगडही रस्त्यावर येत आहेत. वाझोली गावातून निवी, कसणी, निगडे, घोटील अशा अनेक दुर्गम वाड्या-वस्त्यांना हा रस्ता उपयुक्त आहे.

तहसीलदारांनी तातडीने दिल्या सूचना 

वाझोली गावाजवळच्या डोंगरावरील भलेमोठे दगड लोकवस्तीत कोसळण्याच्या भीतीने येथील ग्रामस्थांची झोप उडवलेली आहे. दरड कोसळल्याच्या प्रकाराने त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी पोलिस पाटील विजय सुतार यांनी तहसीलदार अनंत गुरव यांनी या घटनेची माहिती दिली. तहसीलदारांनी तातडीने बांधकाम विभागाला पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

मागील महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. यावेळी तलाठी डी. जे. कोडापे यांनी वाझोली गावच्या डोंगरावर जाऊन पाहणी करून याची माहिती दिली आहे. मात्र, अद्याप यावर काहीच उपाययोजना झालेली नाही. मुसळधार पावसामुळे मोठ्या दगडाच्या शेजारील दगड रस्त्यावर आलेले आहेत. मंत्री शंभुराज देसाई यांनाही याबाबत माहिती दिली आहे. :आनंदा मोरे, माजी अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती, वाझोली

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy