Explore

Search

April 8, 2025 6:35 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Bollywood News : अभिनेत्री उर्फी जावेद सेटवरच पडली बेशुद्ध

मोठा खुलासा, 50 तास शूटिंग आणि…

उर्फी जावेद हिने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांपासून केलीये. मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर आपल्या करिअरमध्ये मोठा संघर्ष हा उर्फी जावेद हिला करावा लागलाय. हेच नाही तर काही दिवसांपूर्वीच उर्फी जावेद हिच्याकडून सांगण्यात आले की, मुंबईमध्ये तिच्याकडे राहण्यासाठी घर नव्हते. चक्क रस्त्यावर झोपून तिने दिवस काढले आहेत. उर्फी जावेद ही सोशल मीडियावर तूफान सक्रिय असते. अतरंगी स्टाईलमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना उर्फी जावेद ही कायमच दिसते. उर्फी जावेद हिच्यावर लोकांकडून प्रचंड अशी टीका केली जाते. मात्र, होणाऱ्या टिकेचा काहीच परिणाम उर्फी जावेद हिच्यावर होत नाही.

काही दिवसांपूर्वीच उर्फी जावेद हिच्या कपड्यांच्या विरोधात महिला या रस्त्यावर उतरल्या होत्या. उर्फी जावेद अतरंग कपड्यांमध्ये कायमच दिसते. आता नुकताच उर्फी जावेद हिच्याकडून एक मोठा खुलासा करण्यात आलाय. उर्फी जावेद हिचे हे बोलणे ऐकून लोक चांगलेच हैराण झाल्याचे देखील बघायला मिळतंय.

उर्फी जावेद ही म्हणाली की, मी अगोदर टीव्ही मालिकांमध्ये काम करत होते. सतत मालिकेची शूटिंग सुरू असायची. हेच नाही तर मी ज्यावेळी मालिकेत काम करत होते, त्यावेळी मला फक्त दोन तास झोप मिळायची. सततच्या शूटिंगमुळे खूप जास्त थकून जात होते. मात्र, काय करणार काम तर करायचे होते.

सतत 50 तास शूटिंग केल्याने मी इतकी जास्त थकले की, मला थेट  सेटवरच चक्कर आली. पुढे उर्फी जावेद ही म्हणाली की, जर मालिकेमध्ये तुम्ही मुख्य भूमिकेत असाल तर ठीक आहे नाही तर साईड रोल करणाऱ्या लोकांना सेटवर चांगली वागणूक मिळत नाही. काही प्रॉडक्शन हाऊसेस खूप वाईट आहेत.

उर्फी जावेद ही मेरी दुर्गा मालिकेत आरती सिंघानियाच्या भूमिकेत होती. मध्यंतरी चर्चा होती की, उर्फी जावेद ही एकता कपूर हिच्या चित्रपटांमध्ये धमाका करताना दिसणार आहे. मात्र, त्यानंतर त्याचे काही अपडेट झाले नाही. उर्फी जावेद ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आज मोठी कमाई नक्कीच करते.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy