मुलीकडून संशयित महिला पाय दाबून घेत होती, तसेच एका चित्रफितीमध्ये मतिमंद मुलीला संबंधित संशयित महिला दारूच्या बाटल्या डब्यात ठेवायला सांगत असल्याचे दिसून येत होते.
कराड : टेंभू येथील अनाथाश्रमाच्या नावाखाली महिलेला देहविक्री करण्यास प्रवृत्त करणाऱ्या अनाथाश्रम चालक महिलेच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला. त्यानुसार संबंधित महिलेने एका दिव्यांग मुलीला मारहाण करून तिला वैद्यकीय उपचारापासून वंचित ठेवत तिचे शारीरिक व मानसिक शोषण केल्याची तक्रार केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेंभू येथे अनाथाश्रम चालविला जात होता. तो आश्रम चालविणाऱ्या महिलेने परपुरुषांशी अनैतिक संबंध ठेवण्यास तसेच देहविक्री व्यवसाय करण्यास भाग पाडल्याची फिर्याद एका महिलेने पोलिसात दिली होती. त्यानुसार अनाथाश्रम चालविणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी संशयित महिलेच्या आश्रमावर छापा टाकला असता तेथे एक दिव्यांग मुलगी व तिची आजी आढळून आली.
त्यांना पोलिसांनी शासकीय वसतिगृहात पाठवले. संशयित महिलेच्या काही चित्रफिन्ती समाज माध्यमात प्रसारित झाल्या आहेत. त्यामध्ये ती महिला दिव्यांग मुलीकडून पस्काम करून घेत असल्याचे दिसून येत आहे, तसेच मुलीला मारहाणही केली जात होती. मुलीकडून संशयित महिला पाय दाबून घेत होती, तसेच एका चित्रफितीमध्ये मतिमंद मुलीला संबंधित संशयित महिला दारूच्या बाटल्या डब्यात ठेवायला सांगत असल्याचे दिसून येत होते. ही बाब निदर्शनास आल्यानंतर पोलिस हवालदार स्वींद्र देशमुख यानी याबाबतची फिर्याद कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली आहे.
