पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले जिल्हा पोलिसांना आदेश
सातारा : बदलापूर येथे झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर आता सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे ॲक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे आज त्यांनी प्रशासनाबरोबर बैठक घेऊन आढावा घेतला. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतलेल्या सातारा जिल्हा प्रशासना च्या बैठकीत शाळा कॉलेज यांना महिलांच्या सुरक्षतेच्या बाबतीत विशेष उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये शाळा कॉलेजमध्ये असणाऱ्या स्वच्छता गृहांच्या एन्ट्री पॉईंट मध्ये बदल करण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच महिला आणि मुलींच्या स्वच्छतागृहाची देखभाल ही महिला कर्मचाऱ्यांनीच करावी असे देखील आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक शाळेमध्ये आणि कॉलेज मध्ये पोलीस अधिकाऱ्यांची नावे अणि मोबाईल नंबर देण्याचे नियोजन केले आहे. सातारा जिल्ह्यामध्ये महिला पथदर्शी प्रकल्प अंतर्गत आतापर्यंत 2021 ला 3819 कारवाया केलेले आहेत. गेल्या वर्षभरामध्ये 27 हजार 629 कारवाया या प्रकल्पांतर्गत केलेले आहेत.यावर्षी जुलै महिन्यापर्यंत 7693 कारवायांची नोंद आतापर्यंत झालेली आहे. या कारवायांमध्ये ज्या विद्यार्थ्यावर तीन वेळा कारवाई झाली असेल किंवा वारंवार कारवाई झाली असेल अशा विद्यार्थ्यांची धिंड पोलिसांना काढण्याचे स्पष्ट आदेश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत.
