सातारा : राज्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आलेली आहे. फलटण तालुक्यामध्ये दुस-या टप्प्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण पोर्टल वरती प्राप्त झालेल्या २४ हजार ५२ इतक्या अर्जाची छाननी तालुका स्तरावरती करुन जिल्हा परिषद सातारा यांच्याकडे पाठविलेले आहेत. या पूर्वी फलटण तालुक्यामध्ये नारी शक्ती दूत अॅपवरती प्राप्त झालेल्या ५८ हजार इतक्या अर्जाची छाननी करुन शासनाकडे पाठविण्यात आले होते. सदरच्या अर्जाचे पहिले दोन हप्ते रक्षा बंधन ओवाळणी म्हणून लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेले आहेत, मात्र ज्या बँक खात्यास आधार सिडींग झालेले नाहीत अशा खात्यावर हप्ता जमा करणेस तांत्रीक अडचणी येत आहेत. आतापर्यंत एकूण ८२ हजार ५२ अर्जाची छाननी केलेली आहे.
तरी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले बँक खाते आधार सिडिंग आहे अथवा नाही हे तपासावे अदयाप आपले खाते ईकेवायसी झाले नसल्यास त्वरीत करुन घेणे, असे बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प फलटण, प्रियंका हरिश्चंद्र गवळी यांनी कळविले आहे.
