Explore

Search

April 15, 2025 9:08 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : संभाजीनगर येथे धार्मिक, शैक्षणिक स्थळांसाठी डस्टबिनचे वाटप

सातारा : संभाजीनगर ता. सातारा ग्रामपंचायतीचे वतीने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील सर्व धार्मिक व शैक्षणिक स्थळांना डस्टबिनचे वाटप सरपंच सतीश माने यांच्या हस्ते करण्यात आले.

स्वच्छ व समृद्ध संभाजीनगर ही संकल्पना अमलात आणण्यासाठी ग्रामपंचायतीचेवतीने हा लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात आला. ग्रामपंचायत हद्दीत असणारी सर्व धार्मिक स्थळे व शाळा या ठिकाणी भाविकांची, विद्यार्थ्यांची व ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अशा सार्वजनिक ठिकाणी निर्माल्य,पूजा साहित्य यांची वेस्टने, बागबगीच्या चा पालापाचोळा, खाद्यपदार्थांची वेस्टने इत्यादी प्रकार च्या कचरा संकलनाची गैरसोय असल्याने परिसर अस्वच्छ होत होता. स्वच्छ व समृद्ध संभाजीनगर ही संकल्पना सत्यात आणून प्रभावीपणे अमलात आणण्यासाठी, सार्वजनिक ठिकाणी कचरा संकलनासाठी लागणाऱ्या मोठ्या आकाराच्या डस्टबिनची गरज ओळखून, ग्रामपंचायतच्यावतीने मोठ्या आकाराच्या डस्टबिनचे लोकार्पण करण्यात आले.

या प्रसंगी सरपंच सतीश माने, उपसरपंच काशिलिंग गोरड, गटनेते सुभाष उर्फ दादा तांगडे, सदस्य अनिल पिसाळ, गिरीश ढेंबरे, सौ. हेमलता भिंताडे, सौ. वैशाली तरडे, सौ. प्रियांका अवसरे, सौ. छाया निकम, सौ. शोभाताई सरतापे, सौ. मेघा राणी जाधव, दत्तात्रेय जगताप, सुनील फडतरे, बी. आर. राजे, कार्याध्यक्ष जयवंतराव मोरे, ग्रामविकास अधिकारी मोहन कोळी तसेच सर्व गृहनिर्माण संस्था व नागरी वसाहतींचे चेअरमन सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy