Explore

Search

April 12, 2025 8:09 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेचा भव्य एक्स्पो येत्या शुक्रवारी व शनिवारी

सातारा : सातारा रनर्स फौंडेशनच्यावतीने दरवर्षी आयोजित केली जाणारी व संपूर्ण देशभरात लोकप्रिय अशी जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा रविवार, दिनांक १ सप्टेंबर २०२४ रोजी होणार आहे.

या स्पर्धेचा भव्य एक्स्पो शुक्रवार, दिनांक ३० ऑगस्ट व शनिवार, दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ रोजी असा दोन दिवस आयोजित केला आहे. हा एक्स्पो दि. ३० ऑगस्ट रोजी दुपारी १२.०० ते सायंकाळी ७.०० आणि दि ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या दरम्यान स्पर्धकांसाठी खुला असणार आहे.

शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील कै अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक संकुल येथे या भव्य एक्स्पोचे आयोजन केले असून या एक्स्पोचे उद्घाटन शनिवार, दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता श्री छ सौ वेदांतिकाराजे भोसले वहिनीसाहेब यांच्या शुभहस्ते तर सातारचे लोकप्रिय आमदार श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असून या कार्यक्रमाला अजिंक्यतारा सहकारी कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री जिवाजी मोहिते हे देखील उपस्थित राहणार आहेत अशी माहिती संयोजन समितीच्या अध्यक्षा डॉ आदिती चंद्रशेखर घोरपडे, उपाध्यक्ष आर्किटेक्ट श्री उपेंद्र पंडित व सचिव विशाल ढाणे यांनी संयुक्तरित्या दिली.

या एक्स्पोमध्ये स्पर्धेसाठी आवश्यक असणारे रेस किट स्पर्धकांना वितरित करण्यात येणार असून त्यामध्ये टी शर्ट, रनिंग बीब, संगणकीकृत टाईमिंग चिप इत्यादींचा समावेश आहे. त्यासाठी स्पर्धकांनी नांव नोंदणी केल्याचा पुरावा म्हणून त्यांना आलेला ई-मेल अथवा त्यांच्या मोबाईलवर आलेला मेसेज दाखवणे हे अनिवार्य आहे. प्रत्येक स्पर्धकाने वयाचा व रहिवासी पत्याचा पुरावा म्हणून आधारकार्ड सोबत आणणे आवश्यक आहे असे आवाहन सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे संस्थापक अध्यक्ष डॉ संदीप काटे यांनी केले आहे.

सर्व स्थानिक सातारकर धावपटूंनी आपले रेसकीट हे शक्यतो एक्स्पोच्या पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवार, दिनांक ३० ऑगस्ट २०२४ रोजी ताब्यात घ्यावेत, जेणे करुन दुसऱ्या दिवशी बाहेरगावच्या स्पर्धकांनादेखील रेस कीट व बिब घेणे सोयीचे होईल, त्यामुळे दोन्ही दिवशी होणारी गर्दी टाळता येईल व त्यामुळे स्पर्धकांचीदेखील गैरसोय होणार नाही असे आवाहन रेस डायरेक्टर श्री अभिषेक भंडारी यांनी संयोजन समितीच्यावतीने केले आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy