Explore

Search

April 15, 2025 9:20 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Karad Crime : पाच लाखांचे मोबाईल मुळ मालकांकडे

पोलिसांची मोठी कामगिरी

कराड : मागील दोन वर्षात गहाळसह चोरीस गेलेले पाच लाखांचे २६ मोबाईल शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने हस्तगत केले. त्यासाठी पोलिसांनी महाराष्ट्रसह परराज्यात कारवाई करण्यात आली. आज दुपारी हस्तगत केलेले मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले.

मागील काही वर्षांपासून भाजी मंडई तसेच शहराच्या विविध भागातून मोबाईल गहाळ होणे अथवा मोबाईल चोरी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा चोरीस गेलेले अथवा गहाळ झालेले मोबाईल गंभीर गुन्ह्यात वापरले जातात.

त्यामुळेच पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांच्या सूचनेवरून कराड शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हवालदार संग्राम पाटील व त्यांचे सहकारी मागील दोन वर्षांपासून चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध घेत होते.

चोरीस गेलेल्या अथवा गहाळ झालेल्या मोबाईलबाबत सायबर पोलीस ठाण्यातून माहिती मिळवत संग्राम पाटील व त्यांच्या सहकार्याने राज्यातील विविध भागासह परराज्यात कारवाई करत संबंधितांकडून मोबाईल ताब्यात घेतले होते. त्यानंतर मोबाईलच्या मूळ मालकांचा शोध घेत गुरुवारी दुपारी पोलीस निरीक्षक के एन पाटील यांच्या उपस्थितीत मूळ मालकांना परत करण्यात आले.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy