Explore

Search

April 12, 2025 8:06 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Rohit Sharma and Hardik Pandya: हार्दिक आणि रोहित यांच्यातला वाद कसा मिटला

राहुल द्रविड यांनी केली ही एकच गोष्ट

हार्दिक आणि रोहितमधील वाद मिटवण्यामध्ये राहुल द्रविड यांची प्रमुख भूमिका होती अशी माहिती समोर आली आहे. त्यासाठी त्यांनी कोहलीलाही हाताशी धरल्याचं समजतं. द्रविड यांनी एकच गोष्ट केली.

द्रविड यांनी काय केलं ?

आयपीएलनंतर लगेच आयसीसी टी-20 विश्वचषकाची स्पर्धा होती आणि यावेळी रोहित शर्माकडे टीम इंडियाची धूरा होती. त्यामुळे रोहित आणि हार्दिक यांच्यातील मतभेद दूर होतील की नाही?, असे प्रश्न उपस्थित होत होते. पण एका रिपोर्टनुसार, कोच राहुल द्रविड आणि कोहली यांनी हार्दिक-रोहितला एकत्र आणण्यात महत्वाची भूमिका बजावली.

असा मिटला वाद

आयपीएलनंतर भारतीय संघ टी 20 वर्ल्ड कप 2024 अमेरिकेत दाखल झाला आणि सराव सुरू केला. पहिल्या दिवशी रोहित आणि हार्दिक एकमेकांशी बोलले देखील नाहीत. पण दुसऱ्या दिवशी रोहित आणि हार्दिक एका कोपऱ्यात एकत्र बसून बोलतांना दिसले. बराच वेळ त्यांचा संवाद चालू होता. त्यानंतर दोघांनी एकत्र सराव केला. रोहित शर्माने त्याच्या सहकाऱ्याची फलंदाजी आणि गोलंदाजीदेखील तपासली.

एका रिपोर्टनुसार, रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याला एकत्र आणण्यात राहुल द्रविड आणि विराट कोहली यांनीही खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. द्रविडने रोहित शर्मा आणि हार्दिक या दोघांना एकत्र बोलावलं. आपली भूमिका समजावून सांगतानाचा त्या दोघांचं संघातील स्थान काय आहे हेही समजावलं. जबाबदारी समजावत सर्व गोष्टी स्पष्टपणे  सांगितल्या. ही बैठक महत्वाची ठरली. त्यावेळी विराट कोहली देखील उपस्थित होता.

अखेर टी 20 वर्ल्डकपमध्ये संपूर्ण भारतीय संघ एकजूट होऊन खेळताना दिसला. आणि फायनलमध्ये विजय मिळवत भारतीय संघाने टी 20 वर्ल्डकपवर नावही कोरलं. त्या विजयानंतर रोहित-हार्दिकने मारलेली मिठी, तो क्षण आजही सर्वांच्या लक्षात आहे.

रोहित पडणार बाहेर ?

दरम्यान, आयपीएल 2025 च्या हंगामात रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा संघ सोडून लखनौच्या संघात सामील होऊ शकतो, असा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. मेगा ऑक्शन दरम्यान लखनौ सुपर जायंट्सकडून रोहित शर्मासाठी 50 कोटी रुपयांची बोली लावणार असल्याची देखील चर्चा आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy