Explore

Search

April 8, 2025 6:35 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Web Series : ‘मिर्झापूर ३’मध्ये मुन्ना त्रिपाठीची पुन्हा एन्ट्री

या दिवशी रिलीज होणार खास बोनस एपिसोड

‘मिर्झापूर ३’ वेबसीरिजची चांगलीच चर्चा झाली. काही महिन्यांपासून बहुप्रतिक्षित असलेली ‘मिर्झापूर ३’ प्रेक्षकांच्या भेटीला आली. पुन्हा एकदा रहस्यमयी थ्रिलर कथानकाने ‘मिर्झापूर’ चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतला. या वेबसीरिजमध्ये एका गोष्टीची कमी सर्वांना जाणवली ती म्हणजे मुन्नाभैय्याची. मुन्नाभैय्या अर्थात अभिनेता द्विवेंदू शर्माच्या व्यक्तिरेखेचा अंत दुसऱ्या सीझनमध्ये झाल्याने ‘मिर्झापूर ३’मध्ये मुन्नाभैय्या नसल्याने चाहते निराश झाले. परंतु ही निराशा आता दूर होणार आहे कारण मुन्नाभैय्याची विशेष झलक असलेला ‘मिर्झापूर ३’चा लेटेस्ट एपिसोड रिलीजसाठी सज्ज आहे.

या तारखेला रिलीज होणार ‘मिर्झापूर ३’चा एपिसोड

प्राईमव्हिडीओने नुकतंच एक टीझर रिलीज केलाय. या टीझरमध्ये मुन्नाभैय्याच्या भूमिकेत द्विवेंदू शर्माची झलक दिसते. मी निघून काय गेलो एवढा बवाल झाला. माझ्या प्रामाणिक फॅन्सनी मला खूप मिस केलं असं मी ऐकलंय. सीझन ३ मध्ये खूप गोष्टी मिस केल्यात तुम्ही. फक्त तुमच्यासाठी, मुन्ना त्रिपाठीच्या सौजन्याने मी काही गोष्टी शोधून आणल्या आहेत. कारण मी आधी करतो, नंतर विचार करतो.” उद्या ३० ऑगस्टला  मुन्ना त्रिपाठीची खास झलक असलेला हा एपिसोड  प्राईम व्हिडीओवर तुम्हाला पाहायला मिळेल.

मिर्झापूर ३’ विषयी

मिर्झापूर’ सीरिजचा पहिला सिझन ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर दोन वर्षांनी २०२० मध्ये या सीरिजचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. गेल्या वर्षी जून महिन्यापासून तिसऱ्या सिझनसाठी शूटिंग सुरू झालं. आता या वर्षी ‘मिर्झापूर ३’ प्रदर्शित होणार आहे. मार्च महिन्यात या तिसऱ्या सिझनची घोषणा करण्यात आली होती.

‘मिर्झापूर २’ मध्ये कालिन भैय्या म्हणजेच पंकज त्रिपाठीचा मुलगा मुन्ना त्रिपाठी म्हणजेच दिव्येंदू शर्मा याचा मृत्यू दाखवण्यात आला होता. तेव्हापासून वेब सीरिजचे प्रेक्षक ‘मिर्झापूर ३’ ची वाट पाहत आहेत. मध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी, रसिका दुग्गल व्यतिरिक्त विवान सिंह, ईशा तलवार, शाहनवाज प्रधान, राजेश तैलांग, शीबा चड्ढा, विजय शर्मा असे अनेक कलाकार पुन्हा एकदा जुन्या पात्रांमध्ये झळकणार आहेत. द्विवेंदूच्या बोनस एपिसोडमध्ये काय बघायला मिळणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy