सातारा : सातारा हिल हाफ मॅरेथॉन (Satara Hill Half Marathon) ही डोंगरावर होणारी संपूर्ण जगातील वैशिष्ट्यपूर्ण (World famous) मॅरेथॉन आहे. साधारण १३ वर्षापूर्वी पाहिलेले स्वप्न या मॅरेथॉनच्या निमित्ताने दरवर्षी साकारत आहे, याचा आनंद वाटतोय, असे प्रतिपादन खा. श्री.छ. उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी केले आहे.
सातारा रनर्स फाउंडेशन तर्फे आयोजित सलग तेराव्या वर्षाच्या सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी पोलीस परेड ग्राउंड वर ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, संयोजन समितीच्या अध्यक्षा डॉ.आदिती घोरपडे, ॲड.कमलेश पिसाळ, डॉ. चंद्रशेखर घोरपडे, डॉ. संदीप काटे यांच्यासह सातारा रनर्स फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व देशभरातून आलेल्या धावपटूंची उपस्थिती होती.
यावेळी उदयनराजे म्हणाले की, कास हे पूर्वीपासूनचे माझे आवडते ठिकाण आहे. मी नेहमीच घाटाई मंदिर, कास परिसरात जातो. एकदा डॉ. चंद्रशेखर घोरपडे यांच्या समवेत त्या मार्गावरून जात असताना सातारकरांच्या आरोग्य संवर्धनासाठी आणि त्यांना व्यायामाची आवड लागावी यासाठी काहीतरी ठोस उपक्रम घेऊया, अशी चर्चा झाली आणि त्यातूनच सातारा हाफ हिल मॅरेथॉनचा जन्म झाला. निरोगी शरीर हीच प्रत्येकाची खरी संपदा असते आणि ते तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा ठरतो. सातारा हाफ हिल मॅरेथॉनच्या निमित्ताने अनेकांना व्यायामाची आणि धावण्याची सवय लागली, तसेच या स्पर्धेत स्थानिक आणि राज्यभरातून, देशभरातून इतकेच काय परदेशातूनही धावपटू येतात, हे या स्पर्धेचे अनोखे यश आहे.
भविष्यात ही मॅरेथॉन संपूर्ण जगभरात नावलौकिक कमवेल, असा मला विश्वास आहे. धावपटूंना मॅरेथॉनमुळे जशी ऊर्जा मिळते तसेच अशा उपक्रमामुळे संपूर्ण समाजाला गती आणि ऊर्जा मिळते. रनर्स फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी तसेच सातारकर नागरिक, प्रायोजक या सर्वांच्या अथक परिश्रमातून होत असलेल्या सातारा मॅरेथॉनचे नाव जगभर व्हावे, अशा सदिच्छा यावेळी उदयनराजेंनी व्यक्त केल्या.
पुरुषांमध्ये कोल्हापूरचा उत्तम पाटील, तर महिलांमध्ये भंडाऱ्याच्या तेजस्विनी लांबकाने यांनी पटकावला प्रथम क्रमांक
सातारा रनर्स फाउंडेशनच्या वतीने सातारा येथे झालेल्या जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेत कोल्हापूरच्या उत्तम पाटील वय २४ याने ही स्पर्धा १.१३.३२ सेकंदात पूर्ण करून पुरुषांमध्ये पहिला क्रमांक पटकावला. तर भंडाऱ्याच्या कु तेजस्विनी लांबकाने यांनी हे अंतर १.२६.१८ सेकंदामध्ये स्पर्धा पूर्ण करत महिलांमध्ये पहिला क्रमांक पटकावला.
सातारा रनर्स फाउंडेशनच्या वतीने आयोजित जाणाऱ्या स्पर्धेचे हे १३ वर्ष आहे. या मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात पोलिस परेड ग्राउंड येथून सकाळी ६.३० वाजता खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवून झाली. सुमारे ७५०० हून अधिक स्पर्धकांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवला.
बेळगावच्या अनंत गावकर यांनी हे अंतर १.१३.४१ सेकंदात पूर्ण करत पुरुषांमध्ये दुसरा क्रमांक पटकावला.
ओपन (पुरुष)
अनंत गावकर (दुसरा)
१.१३.४१ सेकंद (बेळगावी)
प्रथमेश परमकार (तिसरा)
१.१३.५० सेकंद
ओपन (महिला)
तेजस्विनी लांबकाने (पहिली) १.२६.१८ सेकंद (भंडारा)
साक्षी जडयाल (दुसरी)
१.३१.२६ सेकंद (चिपळूण)
वैष्णवी मोरे (तिसरी)
१.३१.४० सेकंद (कराड)
वयोगट ३० ते ३४ – (महिला)
सोनाली देसाई (प्रथम)
मनीषा जोशी (द्वितीय)
चद्रशमिता हजारीका (तृतीय)
पुरुष – वयोगट ३० ते ३४
अनंत गावकर (प्रथम)
प्रल्हाद धनवत (द्वितीय)
विशाल कामबीरे (तृतीय)
वयोगट ३५ ते ३९ (महिला)
ज्योती ठाकरे (प्रथम)
अर्पिता पंड्या (द्वितीय)
नेत्रा पेलापकर (तृतीय)
पुरुष –
शशी दिवाकर (प्रथम)
किशन कोशारिया (द्वितीय)
विक्रम मिना (तृतीय)
वयोगट ४० ते ४४ (महिला)
आयेशा मानसुखानी (प्रथम)
रीना (द्वितीय)
आरती झंवर (तृतीय)
पुरुष –
परशुराम भोई (प्रथम)
मल्लिकार्जुन पराडे (द्वितीय)
राजेश कोचे (तृतीय)
वयोगट ४५ ते ४९ (महिला)
रत्ना मेहता (प्रथम)
डॉ.पल्लवी मूग (द्वितीय)
सारिका इनानी (तृतीय)
पुरुष –
आरबीएस मोनी (प्रथम)
जयंत शिवडे (द्वितीय)
धर्मेंद्र कुमार (तृतीय)
वयोगट ५० ते ५४ (महिला)
वंदना टंडन (प्रथम)
व्हि एन आरती (द्वितीय)
अर्पणा प्रभुदेसाई (तृतीय)
पुरुष –
रणजित कंबरकर (प्रथम)
सुरेश कुमार (द्वितीय)
रवींद्र जगदाळे (तृतीय)
वयोगट ५५ ते ५९ (महिला)
बिमला बनवाला (प्रथम)
परगी सेठ (द्वितीय)
वर्षा शिंदे (तृतीय)
पुरुष –
हरीश चंद्र (प्रथम)
चरणसिंग (द्वितीय)
तुकाराम नाईक (तृतीय)
वयोगट ६० ते ६४ – महिला
शामला मनमोहन (प्रथम)
ख्रिस्तीन सलढाणा (द्वितीय)
सुसान चम्पनूर (तृतीय)
पुरुष
केशव मोटे (प्रथम)
पांडुरंग चौगुले (द्वितीय)
संजय जाधव (तृतीय)
वयोगट ६५ ते ६९ (महिला)
दुर्गा सील (प्रथम)
परवीन बाटलीवाला (द्वितीय)
लता अलिमचंदानी (तृतीय)
पुरुष (वयोगट ६५ ते ६९)
महिपती संकपाल (प्रथम)
अश्विन होनकार (द्वितीय)
कर्ल फरतमायर (तृतीय)
वयोगट ७० ते ७४-
(पुरुष) गुलजारी चंद्र (प्रथम)
छगनलाल भलानी (द्वितीय)
पुंडलिक नलावडे (तृतीय)
वयोगट ७५
तुकाराम अनुगडे (प्रथम)
भास्कर यादव (द्वितीय)
राजाराम पवार (तृतीय)
