Explore

Search

April 8, 2025 6:40 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Web Series : शाहीद कपूरची वेब सीरिज ‘फर्जी 2’ येतेय?

सहकलाकार भुवन अरोराने दिली महत्वाची माहिती

शाहीद कपूरच्या  लोकप्रिय वेबसीरिज ‘फर्जी 2’ ने धुमाकूळ घातला होता. शाहीदने यामधून ओटीटीवर पदार्पण केलं होतं. अॅमेझॉन प्राईमवर रिलीज झालेल्या या सीरिजने सर्वांनाच खिळवून ठेवलं होतं. शाहीद कपूर सीरिजमध्ये उत्कृष्ट आर्टिस्ट दाखवण्यात आला आहे. त्याची हुशारी एवढी की हुबेहुब नोटा बनवतो. हळूहळू तो याचा धंदाच करु लागतो. मात्र सीरिजच्या शेवटी तो पकडला जाण्याची दाट शक्यता निर्माण होते. आता शाहीद आणि त्याचा मित्र पकडले जातात का हे पुढच्या भागात स्पष्ट होणार आहे. त्यासाठी फर्जी २ कधी येणार याविषयी माहिती समोर आली आहे.

राज आणि डीके दिग्दर्शित फर्जी २ भारतातील सर्वात लोकप्रिय वेबसीरिज ठरली. शाहीद कपूर, विजय सेतुपति, के के मेनन, भुवन अरोरा आणि राशी खन्ना यांची सीरिजमध्ये भूमिका आहे. नुकतंच भुवन अरोराने फर्जी २ बद्दल एक खुलासा केला. डिजिटल कमेंट्रीला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “फर्जी २ प्री प्रोडक्शन स्टेजवर आहे. सीरिजचा पुढचा भाग नक्की येतोय. लेखकांचं काम सुरु आहे. अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही पण मला वाटतं आम्ही फर्जी २ बनवतोय. सध्या प्रत्येक जण व्यस्त आहे.”

भुवनने दिलेल्या या अपडेटनंतर सीरिजची उत्सुकता आणखी ताणली आहे. अद्याप शूटिंग सुद्धा सुरु झालेलं नाही त्यामुळे नक्कीच सीरिजच्या प्रदर्शनासाठी बराच काळ वाट पाहावी लागणार आहे. शाहीदच्या पहिल्याच सीरिजने ओटीटीवर कमाल केली. त्यामुळे त्याच्याकडून आता चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy