Explore

Search

April 12, 2025 8:13 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Cricket News : गौतम गंभीरकडून रोहित शर्माला डच्चू

कॅप्टन म्हणून कोण?

भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक आणि माजी फलंदाज गौतम गंभीर याच्या नेतृत्वात रोहितसेनेने नुकताच श्रीलंका दौरा केला. टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध तब्बल 27 वर्षांनी एकदिवसीय द्विपक्षीय मालिका गमावली. मात्र त्याआधी सूर्यकुमार यादव याच्या कॅप्टन्सीत 3 सामन्यांची मालिका 3-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकली. टीम इंडिया आता बांगलादेश विरुद्ध मायदेशात कसोटी मालिका खेळणार आहे. एकूण 2 सामन्यांची ही मालिका असणार आहे. त्याआधी गौतम गंभीर याने टीम इंडियाची ऑलटाईम वनडे बेस्ट प्लेइंग ईलेव्हन निवडली आहे. गंभीरच्या या प्लेइंग ईलेव्हनमध्ये टीम इंडियाचा विद्यमान कर्णधार रोहित शर्मा याला संधी देण्यात आलेली नाही.

गौतम गंभीरने स्पोर्ट्सकीडासह बोलताना ही ड्रीम प्लेइंग ईलेव्हन निवडली. त्यानुसार स्वत: गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग हे ओपनर असणार आहेत. त्यानंतर राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली या तिघांना मधल्या फळीत ठेवलं आहे. त्यानंतर युवराज सिंह आणि महेंद्रसिंह धोनीचाही समावेश केला आहे. फिरकी गोलंदाज म्हणून अनिल कुंबळे आणि आर अशअविन यांना स्थान मिळालं आहे. वेगवान गोलंदाज म्हणून इरफान पठाण आणि झहीर खान यांची निवड केली आहे.

रोहित गंभीरचा आवडता

गंभीरला रोहितची बॅटिंग आणि कॅप्टन्सी आवडते. गंभीरने अनेकदा रोहितच्या नेतृत्वाचं कौतुक केलंय. मात्र यानंतरही गंभीरच्या या खास प्लेइंग ईलेव्हनमध्ये रोहितला संधी मिळालेली नाही. टीम इंडियाने नुकतंच रोहितच्या नेतृत्वात 17 वर्षांनी टी20i वर्ल्ड कप जिंकला आहे. तसेच टीम इंडिया 2023 साली झालेल्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत उपविजेती राहिली आहे. रोहितच्याच नेतृत्वात टीम इंडियाने ही कामगिरी केली होती.

गंभीरने रोहितला वगळल्याने चाहत्यांना आश्चर्य

गौतम गंभीरची ऑल टाईम इंडिया ईलेव्हन टीम : गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, युवराज सिंह, महेंद्रसिंह धोनी, अनिल कुंबळे, रवीचंद्रन अश्विन, इरफान पठान आणि झहीर खान.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy