Explore

Search

April 12, 2025 8:20 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : श्री गणेश ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतील अपहाराचा तपास एक महिन्यात पूर्ण करा : पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा : श्री गणेश ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. गोकुळ तर्फ पाटण या संस्थेतील ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्यासाठी अपहाराचा तपास एका महिन्याच्या आत करावा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात गणेश ग्रामीण पतसंस्थेसंदर्भात  आढावा बैठक घेण्यात आली.  या बैठकीला अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे,  अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, जिल्हा निबंधक संजयकुमार सुद्रीक यांच्यासह ठेवीदार उपस्थित होते.

गणेश ग्रामीण पतसंस्था अपहाराचा गुन्हा 30 मे 2023 रोजी नोंद झाला आहे. पोलीस विभागाने व सहकार विभागाने सखोल तपास करुन जबाबदारी निश्चित झाल्यानंतर संबंधितांची मालमत्ता सील करावी. त्याच बरोबर पतसंस्थेतील ठेवी ठेवीदारांना लवकर मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही निर्देश पालकमंत्री   देसाई यांनी दिले.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy