Explore

Search

April 19, 2025 10:34 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Crime : ‘लाडकी बहीण’चे एकाच महिलेने भरले 28 अर्ज

आधारकार्डच्या नंबरसाठी लढवली ‘ही’ शक्कल…

पतीने केली मदत 

सातारा : एकाच आधार कार्डवर लाडकी बहीणचे ३० अर्ज खारघरचे आधारकार्ड नंबर भरले. साताऱ्यात या मथळ्याखाली दैनिक लोकमत, सातारा दि.०३/०९/२०२४ रोजी बातमी प्रसिध्द झालेली आहे. सदर बातमीच्या अनुषंगाने तपासणी केली असता “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” ladakibahin.maharashtra.gov.in या नवीन पोर्टलवर प्रतीक्षा पोपट  जाधव मु.पो.मायणी ता. खटाव जि. सातारा या २२ वर्ष वयोगटातील मुलीच्या नावाचे वेगवेगळ्या आधार कार्डचा  वापर करुन अर्ज भरण्यात आलेले आहेत. सदयस्थितीत पोर्टलवर एकूण २८ अर्जांची माहिती प्राप्त झालेली आहे. एकूण किती अर्ज भरण्यात आलेले आहेत, याबाबत माहिती घेण्याची कार्यवाही सुरू आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने  त्रि सदस्य समिती गठीत केलेली असून त्यामध्ये श्रीमती रोहिणी ढवळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालविकास सातारा जिल्हा परिषद, सातारा, विजय तावरे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सातारा व  नितीन तळपे, लीड बँक मॅनेजर, बँक ऑफ महाराष्ट्र, सातारा जिल्हा यांचा समावेश आहे. सद्यस्थितीत एकूण २८ अर्ज छाननी मध्ये निदर्शनास आलेले आहेत. सदर सर्व २८ अर्जामध्ये एकच नाव आहे व सर्व कागदपत्रे ,आधार कार्ड इतर कागदपत्रे ही एकच आहेत. तसेच अर्ज भरतेवेळी वेगवेगळ्या आधार कार्ड क्रमांकाचा वापर करण्यात आलेला आहे, असे दिसून येते. सद्यस्थितीत प्रतीक्षा पोपट जाधव या महिलेने ऑनलाईन अर्जासोबत माणदेशी महिला सहकारी बँक,शाखा मायणी,ता.खटाव,जि.सातारा या एकच बँक खात्याची माहिती पडताळणी केलेल्या सर्व २८ अर्जावर भरलेली असून फक्त रक्कम रुपये ३०००/- दिनांक २९/०८/२०२४ रोजी जमा झालेले आहेत. या व्यतिरिक्त सदर योजनेमधून इतर आधार कार्ड दिलेल्या क्रमांकावरून सदरची रक्कम रुपये ३०००/- जमा झाली नसलेबाबत सर्व अर्जात नमूद केलेल्या बँक खात्यावर वरून चौकशी समितीने खात्री केलेली आहे.

सदर घटनेचा सविस्तर अहवाल आजच सादर करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्यानुसार सद्यस्थितीमध्ये संबंधितांचे जाब जबाब नोंदविण्याची कार्यवाही सुरू आहे. संबंधित महिलेने गूगल वरून वेगवेगळे आधार कार्ड क्रमांकाची माहिती प्राप्त करून घेऊन त्या क्रमांकाचा वापर करून अर्ज भरलेले आहेत .यामध्ये तिला तिच्या पतीने मदत केलेली आहे अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेच्या अनुषंगाने पुढील प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे.

प्रशासनाच्यावतीने संबंधित आधारकार्ड क्रमांक यांच्याशी संलग्न असलेल्या बँक खात्याचा तपशील घेण्याची कारवाई करण्यात यावी, अशा सूचना लीड बँकेचे व्यवस्थापक यांना देण्यात आलेले आहेत.

सदर चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला असून सदर अर्जदार महिला व तिचा पती यांच्याविरुद्ध वडूज पोलीस ठाणे तालुका खटाव जिल्हा सातारा येथे गुन्हा नोंद केला असून त्यांना अटक करण्याचे प्रक्रिया सुरू आहे. या योजनेत सर्वोच्च स्तरावरील छाननीचे पालन केले जात असून संबंधित महिलेच्या खात्यात केवळ तीन हजार रुपये जमा झाले आहेत. सदर योजनेचे दररोज परीक्षण होत असून केवळ आधार सीडेड खाते क्रमांक असलेल्या लाभार्थ्यालाच या योजनेचा लाभ दिला जातो. तसेच एका लाभार्थ्याला एकाच वेळी लाभ मिळेल हे छाननी वेळी सुनिश्चित केले जाते.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy