ठाणे जिल्ह्यात भरलंय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्राणी आणि पक्षांचे अनोखे प्रदर्शन
मुंबई : ठाणे जिल्ह्यात अनोखं आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्राणी आणि पक्षांचे मोठे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्राणी आणि पक्षांचे प्रदर्शनात तुम्हाला साडेपाच फुटांची पाल पाहायला मिळणार आहे. इतकंच नाहीतर मांजर पोपट यांच्या विविध जाती देखील पाहायला मिळणार आहे. विविध देशी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणी आणि पक्षांच्या प्रजांतींचे प्रदर्शन ठाण्यातील मुलुंड येथील सेंट पायास शाळेच्या आवारात आयोजित करण्यात आलेले आहे.
साडेपाच फुटांची आफ्रिकन पाल, मांजर पोपट यांच्या विविध प्रजाती तसेच मासे आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचे प्रदर्शन या पेट शोमध्ये मांडण्यात आलं आहे. डॉग शो च्या माध्यमातून कुत्र्यांच्या विविध प्रजाती आणि त्यांचे स्किल पाहण्याची संधी यावेळी प्राणी प्रेमींना मिळाली. रजोल पाटील यांच्या वतीने या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले आहे. शाळकरी मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनीच या प्रदर्शनाला आवर्जून हजेरी लावली आहे.
