Explore

Search

April 13, 2025 11:01 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Health : कर्नाटक सरकारने डेंग्यू आजाराला महासाथ म्हणून केले घोषीत

कर्नाटक : देशातील काही राज्यात पावसाने कहर केल्यानंतर आता डेंग्यूच्या साथीचा जोर वाढला आहे. याच दरम्यान कर्नाटक राज्याने डेंग्यू आजाराला साथ म्हणून जाहीर केले आहे. कर्नाटक सरकारने डेंग्यू आजाराची वाढती प्रकरणे पाहून या आजाराला महासाथ म्हणून घोषीत केले आहे. आणि या आजाराच्या सर्व प्रकारच्या स्ट्रेनला अधिसूचनेत सामिल केले आहे. हा आजार आता महासाथ म्हणून जाहीर केल्याने डेंग्यू संदर्भात राज्यात अधिक काळजी घेण्यात येत आहे. या आजाराला महामारी म्हणून जाहीर केल्याने आता त्याच्या उपचार आणि बचावाचे नवे प्रोटोकॉल जारी करण्यात आले आहेत.

डेंग्यूच्या प्रकरणांवर राज्यात कठोर नजर ठेवली जात आहे. सर्व विभागांना डेंग्यू कंट्रोल करण्याचे आदेश दिले असल्याचे कर्नाटकाचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले. रुग्णालयांना डेंग्यू रुग्णांसाठी व्यवस्था करण्यासाटी सूचना केलेल्या आहे. तसेच आशा वर्कर आता घरोघरी जाऊन जनतेचे प्रबोधन करीत आहेत. डेंग्यूमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी पावले उचलली जात आहेत. डेंग्यू अळ्यांना ओळखण्याचे आणि त्यांची पैदास रोखण्यासाठी विशेष मोहीमा राबविण्याचे आदेश दिले असल्याचे कर्नाटकाच्या आरोग्य मंत्र्‍यांनी म्हटले आहे.

महामारी म्हणून घोषीत का झाली?

यंदा जानेवारी ते जुलैपर्यंत राज्यात डेंग्यूचे सात हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तसेच एकूण सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस डेंग्यूचा वाढत चाललेला धोका पाहूनच सरकारने त्याला महासाथ म्हणून घोषित केले आहे.आता प्रत्येक रुग्णालयात प्रति वॉर्ड 10 खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत असे कर्नाटक सरकारने म्हटले आहे.

डेंग्यू म्हणजे काय ?

डेंग्य हा आजार डास चावल्याने होतो. डेंग्यू आजार पसरविणारा हा डास स्वच्छ पाण्यात वाढतो. जेव्हा हा डास कोणा व्यक्तीला चावतो. तेव्हा त्याच्या शरीरात डेंग्यू व्हायरस पसरतो. बहुसंख्य प्रकरणात आठवडाभरातच डेंग्यूचा ताप बरा होतो. परंतू काही प्रकरणात हा ताप गंभीर समस्या निर्माण करु शकतो. डेंग्यूमुळे शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी होत जाते. जर पेंशीची संख्या 30 हजाराहुन कमी झाली तर जीवाला धोका निर्माण होतो. डेंग्यूमुळे शॉक सिंड्रोम देखील होऊ शकतो. या आजारात शरीरातील अनेक अवयव निकामी होण्याचा धोका असतो.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy