Explore

Search

April 8, 2025 12:40 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Bollywood News : निसा देवगण बॉलिवूड चित्रपटांमध्ये पर्दापण न करताच सोशल मीडियावर कायम चर्चेत

अजय देवगण आणि काजोल यांची लेक निसा देवगण ही कायमच चर्चेत असते. निसा देवगण हिने अजून बॉलिवूड चित्रपटांमध्ये पर्दापण केले नाहीये. मात्र, असे असतानाही ती सोशल मीडियावर कायमच चर्चेचा विषय ठरते. काही दिवसांपूर्वी निसा देवगण हिचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत होते की, दारूच्या नशेत असल्याने निसा देवगण हिला व्यवस्थित चालताना देखील येत नव्हते. यावरून निसा देवगण हिला लोक खडेबोल सुनावताना दिसले. हेच नाही तर अजय आणि काजोल यांनी लेकीला चांगले संस्कार दिले नसल्याचे अनेकांनी म्हटले.

निसा देवगण हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. काही दिवसांपूर्वीच निसा देवगण ही विदेशात आपल्या मित्रांसोबत धमाल करताना दिसली.  विदेशातील तिचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले. ज्यानंतर ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली. लोकांना निसा देवगण हिचे कपडे अजिबातच आवडले नव्हते.

निसा देवगण ही आता नुकताच मुंबई विमानतळावर स्पॉट झालीये. निसा देवगण हिचे विमानळावरील काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. निसा देवगण हिने हेडफोन लावले आहेत. हेडफोनवर फोन पकडून फोनवर बोलताना निसा देवगण ही दिसत आहे. यावरून आता ती लोकांच्या निशाण्यावर आलीये.

अनेकांनी म्हटले की, बहुतेक निसा देवगण हिचे हेडफोन चालत नाहीत, यामुळेच ती हेडफोनवर फोन ठेऊन बोलत आहे. दुसऱ्याने लिहिले की, पापाराझी यांच्याकडे दुर्लक्ष करण्याची ही नवीन शक्कल आहे वाटत. तिसऱ्याने लिहिले की, बहुतेक निसा देवगण हिचे हेडफोन खराब झाले आहेत. अजून एकाने लिहिले की, काजोलची लेक कधी काय करेल हे सांगण्या कठीण आहे.  यावेळी निसा देवगण ही साध्या लूकमध्ये दिसत आहे.

काजोल हिने काही दिवसांपूर्वीच आपल्या घरी काही जवळच्या लोकांना जेवण्यासाठी बोलावले होते. याचे फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. सर्वजण जेवण करताना दिसत होते. फोटोसोबतच काजोल हिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट देखील शेअर केली होती. त्या पोस्टवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या होत्या.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy