Explore

Search

April 15, 2025 9:22 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Crime : दीपक देशमुख अखेर ईडीच्या ताब्यात

साताऱ्यात कारवाई, दीड तास चौकशी

सातारा : मायणी मेडीकल कॉलेज प्रकरणात फसवणूकीचा दाखल असलेल्‍या सातारा आर्थिक गुन्‍हे शाखेत हजेरीसाठी आलेल्‍या दीपक देशमुख यांना अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने अटक केली. बुधवारी दुपारी सातार्‍यात एलसीबी व आर्थिक गुन्‍हे शाखेत फिल्‍डींग लावून ईडीने ही कारवाई केली.

याबाबत अधिक माहिती अशी, मायणी मेडीकल कॉलेज अपहार प्रकरणातून गुन्‍ह्यांची मालिका दाखल झालेली आहे. वडूज पोलिस ठाणे तेथून सातारा आर्थिक गुन्‍हे शाखा व पुढे ईडीपर्यंत यातील गुन्‍हे वर्ग झालेले आहेत. दीपक देशमुख यांच्यावर मायणी मेडीकल कॉलेज प्रकरणातून २०२३ साली फसवणूकीचा गुन्‍हा दाखल असून त्‍याचा तपास सातारा आर्थिक गुन्‍हे शाखेतील सपोनि शिवाजी भोसले करत आहे. दीपक देशमुख यांना संबंधित गुन्‍ह्यात उच्च न्‍यायालयात जामीन मिळाला आहे. सातारा आर्थिक गुन्‍हे शाखेत तपासासाठी हजर राहण्यासह त्‍यांना अटी व शर्थीवर हा जामीन मिळाला आहे. दुसरीकडे दाखल एका अन्‍य गुन्‍ह्यात ईडी दीपक देशमुख यांच्या शोधात होती.

दीपक देशमुख हे सातार्‍यात आर्थिक गुन्‍हे शाखेत हजेरीसाठी जात असल्‍याची माहिती ईडीला मिळाली. दि. २७ ऑगस्‍ट रोजी त्‍यांनी हजेरी लावली होती. तसेच ४ सप्‍टेबर रोजीही हजेरी होती. या प्रकरणात दीपक देशमुख सकाळी आर्थिक गुन्‍हे शाखेत आले. तपासासाठी शाखेत गेल्‍यानंतर दोन मिनिटांमध्ये ईडीचे पथक त्‍यांच्यासमोर जावून थांबले. ‘हम ईडी विभाग से हैं,’ असे म्‍हणत त्‍यांचा ताबा घेत असल्‍याचे सांगितले. त्‍यानंतर दीपक देशमुख यांनी शांतपणे त्‍यांना सहकार्य करत असल्‍याचे सांगितले. सुमारे दीड तास तेथेच चौकशी केल्‍यानंतर ईडीचे पथक त्‍यांना तेथून घेवून गेले.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy