Explore

Search

April 15, 2025 9:13 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : टिळक मेमोरियलच्या जागेतील पार्किंग वर आक्षेप

चर्च पदाधिकाऱ्यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

सातारा : येत्या गणेशोत्सवामध्ये टिळक मेमोरियल चर्चच्या वहिवाटीच्या जागेवर वाहनांसाठी पार्किंग सोय करण्याचे सातारा पालिकेचे नियोजन आहे. या धोरणावर मेमोरियल चर्चा पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे आक्षेप घेतला आहे याचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना देण्यात आले या निवेदनावर 23 पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत

टिळक मेमोरियल चर्च सातारा चे संचालक प्रकाश भोसले, अंशुमन गायकवाड, कपिल गायकवाड, राजेश अल्वा, नरेंद्र भालेकर,  दिनेश काळे, विक्रम नांदणीकर, भोरे, लीना साळवी या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद आहे की, सातारा पालिकेने 28 ऑगस्ट 2024 च्या बैठकीनुसार टिळक मेमोरियल चर्चेच्या मोकळ्या जागा परिसरात पे अँड पार्क सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ही चर्चा मालकीची वहीवाटीची जागा आहे यापूर्वी सुद्धा अशा प्रकारच्या झालेल्या निर्णयावर चर्चेने वेळोवेळी पालिकेची पत्रव्यवहार केला आहे. टिळक मेमोरियल शहर पोवई नाका येथील चर्च जवळपास 170 वर्ष जुने आहे या चर्चच्या बाजूला असलेल्या जागेवर कविवर्य नारायण वामन टिळक हे उपासना करत असत, त्यामुळे ख्रिस्ती बांधवांसाठी ही जागा पवित्र आहे.

येथे दुसरे कोणतेही काम झाल्यास ख्रिस्ती बांधवांच्या भावना दुखावल्या जातील. याबाबतची जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, आणि ख्रिस्ती बांधवांची ही  संवेदनशील मागणी राज्य शासनाने मान्य करावी, असे निवेदनात नमूद आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy