सातारा : आमदार नितेश राणे यांनी पोलिसांना एकेरी भाषा वापरल्याच्या प्रकरणाचा साताऱ्यात निषेध करण्यात आला. सेवानिवृत्त पोलीस बहुउद्देशीय संस्था सातारा यांचे वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
आमदार नितेश राणे यांनी सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर येथील सभेमध्ये पोलिसांना दमदाटीची वक्तव्य वापरली. या प्रकरणाचा पोलीस बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने निषेध करण्यात आला.
निवेदनात नमूद आहे की, आमदार नितेश राणे हे पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांबाबत बेताल वक्तव्य करीत आहेत. त्यांच्या वक्तव्यावर निर्बंध आणावे, त्यांनी बऱ्याच पोलीस अधिकाऱ्यांच्या आकसातून बदल्या केल्या आहेत. त्या प्रकरणाची चौकशी करावी, तसेच आमदार नितेश राणे यांनी 24 तास पोलिसांना बाजूला करून फिरावे, मग ते कसे फिरतील हे पाहूया. असे आव्हान यावेळी देण्यात आले. जिल्हा प्रशासनाचे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे.
