Explore

Search

April 12, 2025 8:48 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : सुधाकर गुरव व सौ.अश्विनी कुलकर्णी शालामाऊली आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित 

सातारा : येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे संचलित न्यू इंग्लिश स्कूल सातारा मधील शिक्षक सुधाकर गुरव यांना यंदाचा शालामाऊली आ.ब.कंग्राळकर आदर्श शिक्षक पुरस्कार व गणित विज्ञान शिक्षिका सौ.अश्विनी वैभव कुलकर्णी यांना यंदाचा गोविंद बेडकिहाळ गणित, विज्ञान आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .

सातारा येथील इंग्लिश स्कूलच्या गणेश कलादालनात आयोजित शिक्षक दिनाच्या कार्यक्रमांमध्ये या सत्कार मूर्तींचा सोहळा न्यू इंग्लिश स्कूलचे माजी मुख्याध्यापक व ज्येष्ठ शिक्षण तज्ञ आनंदराव उर्फ अण्णा  कंग्राळकर, ज्येष्ठ साहित्यप्रेमी सुहास रानडे व शालेय समितीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह सन्मानपत्र शाल श्रीफळ देऊन करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.एस.ए.महाडिक यांनी केले होते. कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती देवी आणि राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमांचे पूजन करून झाल्यावर सर्व मान्यवरांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला. त्यानंतर ईशस्तवन व स्वागत गीत सचिन राजोपाध्ये व विद्यार्थी विद्यार्थिनींच्या गायन पथकाने केले.

न्यू इंग्लिश स्कूलच्या शालाप्रमुख सुजाता पाटील यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात शाळा माऊलीच्या वतीने शाळेचे माजी मुख्याध्यापक अण्णा कंग्राळकर व माजी शिक्षक गोविंदराव बेडकिहाळ यांनी सर्व शिक्षकांच्या साठी आदर्श शिक्षक पुरस्कार व गणित विज्ञान शिक्षक पुरस्कार सुरू केला. या पुरस्कारामुळे खरोखरच सर्व शिक्षकांना एक वेगळी ऊर्जा मिळाली असून दरवर्षी या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते. हा एक औचित्यपूर्ण असा कार्यक्रम असून यामुळे खरोखरच शिक्षक बंधू-भगिनींना एक वेगळी ऊर्जा मिळत आहे या कार्यक्रमात अण्णा  कंग्राळकर यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार एनसीसी चे चीफ ऑफिसर सुधाकर दत्तात्रय गुरव यांना प्रदान करण्यात आला, तर गोविंदराव बेडकीहाळ गणित विज्ञान शिक्षक पुरस्कार शाळेच्या उपशिक्षिका सौ. अश्विनी वैभव कुलकर्णी यांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुहास रानडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सत्कार सोहळ्यात शाळेच्या इयत्ता सातवीतील विद्यार्थ्याने सुधाकर गुरव सरांचे रेखाटलेले चित्र त्यांना प्रदान करण्यात आले, तसेच एनसीसी कॅडेट ग्रुपच्या वतीने ही सुधाकर गुरव  यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

या सर्व मान्यवरांचा परिचय कल्याणकर यांनी करून दिला सत्काराला उत्तर देताना सुधाकर गुरव सर म्हणाले की, शालामाऊली  ने मला दिलेली ही शाबासकीची थाप आणि हा पुरस्कार मी माझे आई-वडील यांना समर्पित करतो. आज आदर्श शिक्षक म्हणून माझी केलेली निवड भविष्यातही मी माझ्या कार्यातून निश्चितच दाखवून देणार असून या पुरस्काराने अधिकच ऊर्जा प्राप्त झाली आहे.

आदर्श शिक्षिका अश्विनी कुलकर्णी यांनी या पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल मी सर्व शालेय व्यवस्थापन समिती आणि शालामावलीचे विशेष आभार मानते, असे सांगून शतकोत्तर आरोप्य महोत्सवी वर्षात हा पुरस्कार मला मिळाला आणि शाळेने जो माझ्यावर विश्वास टाकला, तो सार्थ करण्याचा मी सदैव प्रयत्न करेन असे सांगितले. उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना शालेय समितीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी पुरस्कार प्राप्त सत्कारमूर्तीचे अभिनंदन करून शिक्षक दिनाच्या दिवशी आज नवी ऊर्जा मिळण्यासाठी आणि सातत्याने कार्यरत राहण्यासाठी अशा पुरस्कारांची निर्मिती माझी मुख्याध्यापक व शिक्षकांनी केली. आज संपूर्ण भारत देशात गुरुजनांची ओळख ही त्यांचे विद्यार्थी पुढे नेत आहेत. शिक्षकांच्या कार्याचे स्मरण करण्यासाठीच हा दिवस असून हा पुरस्कार खरोखरच शिक्षकांना प्रेरणा देणार आहे. मोठ्या पावलावर पाऊल ठेवून छोटी पावले पुढे येण्यासाठी आणि नवीन पिढी घडवण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध आहोत. शिक्षक दिन हा केवळ एका दिवसासाठी नसून संपूर्ण आयुष्यभर शिक्षकी पेशा जपत विद्यार्थी घडवण्याचे काम संपूर्ण शिक्षक वर्ग करत आहे. मान्यवरांच्या आदर्शांची जोपासना व वाटचाल करत आपण नवीन व्यक्तिमत्व घडवाल यात शंका नाही असे सांगितले.

प्रमुख पाहुणे सुहास रानडे यांनी, शिक्षक दिन हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असून या पुरस्कारामुळे निश्चितच शिक्षक वर्गाला पाठबळ मिळणार आहे, असे सांगून मान्यवरांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कल्याणकर सर यांनी केले. कार्यक्रमास माजी शिक्षक र.मा.पवार, कांबळे यांचे सह पर्यवेक्षक सर, पर्यवेक्षिका, पालक संघाच्या प्रतिनिधी सौ.ठोंबरे व पालक संघाचे सदस्य तसेच मान्यवर शिक्षक, शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy