Explore

Search

April 12, 2025 8:05 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Duleep Trophy 2024 : इंडिया ए संघावर मुशीर खान एकटाच पडला भारी

आठव्या गड्यासाठी 200 धावांची…

दुलीप ट्रॉफी स्पर्धेत इंडिया ए आणि इंडिया बी संघ आमनेसामने आहेत. इंडिया बी संघाची नाजूक स्थिती असताना एकटा मुशीर खान शुबमन गिलच्या इंडिया ए संघावर भारी पडला. 94 धावांवर 7 विकेट अशी स्थिती होती. त्यामुळे इंडिया बी संघ फार फार तर 150 धावांपर्यंत मजल मारेल असं वाटत होतं. पण भलतंच घडलं. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या मुशीर खानने तग धरून ठेवला. एकीकडे फलंदाज खेळपट्टीवर हजेरी लावून जात होते. त्यामुळे इंडिया बी संघाचं काय खरं नाही असंच वाटत होतं. पण मुशीर खानला आठव्या क्रमांकावर खेळायला आलेल्या नवदीप सैनीची साथ लाभली. दोघांनी मिळून आठव्या गड्यासाठी 205 धावांची भागीदारी केली. त्यामुळे संघाला 300 च्या पार मजल मारता आली. एकट्या मुशीर खानने 373 चेंडूंचा सामना करत 181 धावा केल्या. खरं तर मुशीर खानची विकेट जाईपर्यंत त्याने आपली भूमिका व्यवस्थित बजावली होती. संघाला सुस्थितीत आणण्यास मुशीर खानचा मोलाचा हातभार लागला.
मुशीर खानने नवदीप सैनीसोबत भागीदारी केली नसती तर आता संघाची स्थिती काही वेगळी असती. समोर कुलदीप यादव, आवेश खान, शिवम दुबे, कुलदीप यादव आणि रियान परागसारखे दिग्गज गोलंदाज असताना मुशीर खानने त्यांना पाणी पाजलं. मुशीर खानला बाद करण्यासाठी शुबमन गिलने गोलंदाजीतील सर्व अस्त्र वापरली. पण विकेट मिळवणं कठीण झालं. दुसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंतचं सत्र मुशीर खानने गाजवलं. 150 धावांचा पल्ला ओलांडून इंडिया ए संघाच्या नाकी नऊ आणले. 200 धावांच्या दिशेने कूच करत असताना कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर बाद झाला. 181 धावांवर असताना रियान परागने त्याचा झेल पकडला. पण तिथपर्यंत त्याने आपलं काम केलं होतं.
19 वर्षीय मुशीर खानची देशांतर्गत क्रिकेटमधील खेळी पाहून निवड समितीला विचार करावा लागणार आहे. मुशीर खान देशांतर्गत क्रिकेटमधील रनमशिन्स असल्याचं आता क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. मुशीर खानने रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत 357 चेंडूत नाबाद 203 धावांची खेळी केली होती. त्यानंतर उपांत्य फेरीत 131 चेंडूत 55 धावा केल्या आणि अंतिम फेरीत 326 चेंडूचा सामना करत 136 धावा केल्या होत्या. आता दुलीप ट्रॉफी स्पर्धेत 373 चेंडूत 181 धावा केल्या आहेत. त्यामुळे मुशीर खानचा विचार बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात होईल असं दिसत आहे.
Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy