Explore

Search

April 8, 2025 12:16 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Bollywood News : ‘वीर-जारा’ ही प्रेमकथा पुन्हा एकदा चित्रपटगृहात होणार दाखल 

शाहरूख-प्रितीचा रोमँटिक ड्रामा

शाहरुख खान आणि प्रीती झिंटा  यांची ‘वीर-जारा’ ही प्रेमकथा पुन्हा एकदा चित्रपटगृहात दाखल होणार आहे. चित्रपट निर्माते यश चोप्रा यांची सिनेमातील जादू लोकांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. वीर-जारा हा शाहरुख खानच्या सर्वोत्तम रोमँटिक चित्रपटांपैकी एक आहे. शाहरुखचा क्वचितच असा कोणताही चाहता असेल ज्यांच्या आवडत्या चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाचा समावेश नाही. चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाल्याच्या घोषणेने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

शाहरुख खान आणि प्रिती झिंटाचा रोमँटिक ड्रामा चित्रपट १३ सप्टेंबरला पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यशराज फिल्म्सच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर चित्रपटाच्या पुन्हा रिलीजची माहिती शेअर करण्यात आली आहे. पोस्टमध्ये लिहिले होते, ‘स्वर्गात बनलेली वीर-जारा जोडी शुक्रवारी, १३ सप्टेंबरला थिएटरमध्ये परतत आहे! तुमच्या जवळच्या सिनेपोलिस स्क्रीनवर पाहा!’

चाहते झाले उत्सुक :
चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार असल्याची माहिती मिळताच चाहते उत्साहित झाले. एका सोशल मीडिया यूजरने कमेंट केली, वॉव. पुन्हा सिनेमा पाहण्यासाठी वाट पाहू शकत नाही. दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘दिवसाची सर्वोत्तम बातमी.’ वीर-जारा हा एक सुंदर चित्रपट आहे.

‘वीर-जारा’ ही प्रेम आणि त्यागाची कथा :
यश चोप्रा दिग्दर्शित, वीर-जारा ही प्रेम, त्याग आणि आशा यांची सशक्त कथा आहे. यासोबतच ही कथा सीमा आणि पिढ्या ओलांडते. या चित्रपटात अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, राणी मुखर्जी, दिव्या दत्ता आणि मनोज वाजपेयी यांच्याही भूमिका होत्या. या चित्रपटात भारतीय हवाई दलाचा पायलट वीर प्रताप सिंग (शाहरुख खान) आणि पाकिस्तानी महिला झारा हयात खान (प्रीती झिंटा) यांची अमर प्रेमकथा दाखवण्यात आली आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy