Explore

Search

April 14, 2025 1:43 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

District Award : उत्कृष्ट लघुउद्योगांना जिल्हा पुरस्कार

सातारा : जिल्हयातील उद्योग क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या लघुउदयोजकांना महाराष्ट्र  शासनामार्फत जिल्हा पुरस्कार देण्यात येतात. सदर लघु उदयोग पुरस्कार प्राप्त उदयोजकास प्रथम क्रंमाकास  रु. १५ हजार व व्दितीय क्रंमाकास रु. १० हजार व मानचिन्ह,शाल, श्रीफळ देण्यात येते. जिल्हयातील पुरस्कारासाठी जिल्हास्तरीय समितीमार्फत उपरोक्त बाबीकरीता गुण देऊन निवड करण्यात येते.

पुरस्कारासाठी अर्जासोबत पुढिलप्रमाणे  कागदपत्रे जोडणे आवश्यक – १) विहित नमुण्यातील अर्ज  2)लघु उदयोग घटक हा मागील तीन वर्ष पुर्ण झालेला उदयम आधार नोंदणीकृत असावा ३) मागील तीन वर्ष उदयोम घटकाचे उत्पादन सुरु असावे. ४) लघु उदयोग घटक हा कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. ५) या पुर्वी जिल्हा पुरस्कार प्राप्त घटक जिल्हा पुरस्कार योजनेस पत्र राहणार नाहीत. ६) सनदी लेखापाल यांचेकडील मागील ३ वर्षाचे ताळेबंद पत्र नफा तोटा पत्रक सादर करणे आवश्यक आहे.

जिल्हा पुरस्कार योजनेचा लाभ घेवू इच्छिणाऱ्या उदयोगघटकांनी  दिनांक २५ सप्टेंबर २०२४ पर्यंत विहीत नमुण्यातील अर्ज प्राप्त करुन परिपुर्ण अर्ज कार्यालयास सादर करावेत असे अहावन महाव्यवस्थापक , जिल्हा उदयोग केंद्र सातारा यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी महाव्यवस्थापक जिल्हा उदयोग केंद्र , औदयागीक वसाहत एम आय डी सी , फुलोरा हॉटेल जवळ सातारा दुरध्वनी क्रंमाक  ०२१६२- २४४६५५  इमेल – diddic.satara@maharastra.gov.in येथे संपर्क साधावा.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy