Explore

Search

April 15, 2025 9:11 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Crime : चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा

सातारा : दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चैन स्नॅचिंग केल्याप्रकरणी दोन अज्ञातांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 6 सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मुकेश खिमजी पटेल रा. संगमनगर, सातारा हे मॉर्निंग वॉक साठी संगमनगर चौक ते जुन्या एमआयडीसीमधील मुथा कंपनीच्या रस्त्याने चालत निघालेले असताना पाठीमागून एफ झेड कंपनीच्या, विना नंबर प्लेटच्या दुचाकीवरून तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची चेन हिसकावून पोबारा केला आहे. त्याचप्रमाणे जयश्री जवाहर शहा यांचे मंगळसूत्र स्नॅचिंग करून चोरून नेले आहे. याबाबतचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून अधिक तपास महिला पोलीस निरीक्षक काळे करीत आहेत.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy