Explore

Search

April 13, 2025 11:02 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : नेत्रदान पंधरवाडा वॉकेथॉनचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या हस्ते

सातारा : दिनांक 8 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हा रुग्णालय, सातारा येथे नेत्रदान पंधरवड्या निमित्त वॉक फॉर आय डोनेशन अर्थात एक पाऊल नेत्रदानासाठी या संकल्पनेतून वाकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. याचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय याशनी नागराजन यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.

या वॉकेथॉनची सुरुवात जिल्हा रुग्णालय, सातारा येथून होऊन खालच्या रस्त्याने शेटे चौक व तिथून परत जिल्हा रुग्णालय सातारा येथे सांगता झाली. याप्रसंगी आयोजित उद्घाटन कार्यक्रमांमध्ये बोलताना याशनी नागराजन मॅडम यांनी सर्व उपस्थित लोकांचे कौतुक केले. तसेच जिल्हा रुग्णालयातील नेत्रदानासंबंधी होत असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. या वाकेथॉनमध्ये साधारण 350 सातारकरांनी आपला सहभाग नोंदवला. शहरातील अनेक डॉक्टर्स, सामाजिक संस्था, स्पोर्ट ग्रुप व इतर अनेक सातारकरांनी यामध्ये भाग घेतला. माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांनी नेत्रदान विषयी माहिती दिली व अधिकाधिक लोकांनी नेत्रदानासाठी पुढे यावे असे, आवाहनही या निमित्ताने उपस्थितांना केले. सदर कार्यक्रमाचे व्यवस्थापन व सूत्रसंचालन डॉक्टर सुजाता राजमाने यांनी केले. याप्रसंगी जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर चंद्रकांत काटकर, डॉक्टर सुभाष कदम, डॉक्टर प्रिया मेश्राम, डॉक्टर अरुंधती कदम, डॉक्टर संजीवनी शिंदे, डॉक्टर पूनम लाहोटी, नेत्र चिकित्सा अधिकारी शिंदे, नायकवडी  कांबळे, पाटोळे, जिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy