Explore

Search

April 13, 2025 8:30 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : राज्यस्तरीय विनोदी कथा स्पर्धेत सहभागाचे आवाहन

सातारा : गुंफण अकादमीच्या वतीने प्रतिवर्षी घेण्यात येणाऱ्या माजी खासदार प्रेमलाताई चव्हाण स्मृती राज्यस्तरीय विनोदी कथा स्पर्धेसाठी विनोदी कथा पाठवण्याचे आवाहन अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी केले आहे.

मराठी साहित्य क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या कथा स्पर्धेचे हे २२ वे वर्ष आहे. विनोदी साहित्य व विनोदी लेखन करणारे लेखक यांच्या बाबतीत निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याच्या आणि नवोदित विनोदी लेखकांना प्रोत्साहन व व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने गुंफण अकादमीतर्फे ही स्पर्धा घेतली जाते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या स्पर्धेला प्रतिसाद मिळत असतो.
स्पर्धेसाठी पाठवावयाची विनोदी कथा सुटसुटीत असावी. दीर्घकथा नसावी. स्पर्धेसाठी आलेल्या कथांचे तज्ञ परीक्षकांमार्फत परीक्षण होऊन निकाल जाहीर करण्यात येईल. विजेत्या कथालेखकांना रोख पारितोषिके व प्रशस्तीपत्र देऊन समारंभपूर्वक सन्मानित करण्यात येईल. लेखकांनी आपली स्वरचित विनोदी कथा कागदाच्या एका बाजूस सुवाच्य अक्षरात लिहून अथवा टाईप करून दि. २५ सप्टेंबरपर्यंत डॉ. बसवेश्वर चेणगे, अध्यक्ष, गुंफण अकादमी, मसूर, ता. कराड, जि. सातारा पिन – ४१५१०६ किंवा रंगरेज इन्फोटेक, पंचशील पार्क, सिद्धीविनायक हॉस्पिटलसमोर, राधिका रोड, मार्केट यार्ड, सातारा या पत्त्यावर पाठवावी. अधिक माहितीसाठी ७५८८६३८६१३ / ८०८०३३५२८९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy