नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रवाशांचा प्रवास आरामदायी आणि वेगवान करणाऱ्या वंदेभारत एक्सप्रेसना आता आणखीन विस्तार केला जात आहे. येत्या 15 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी तब्बल दहा वंदेभारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखविणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंडच्या जमशेदपूर हून वंदेभारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखविणार आहेत. पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर वंदेभारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखविला जाणार आहे. देशात पहिली वंदेभारत एक्सप्रेस दिल्ली ते वाराणसी मार्गावर साल 2019 मध्ये चालविली होती. आतापर्यंत देशात शंभरहून अधिक वंदेभारत एक्सप्रेस धावत आहेत.
या राज्यांना मिळणार नवी वंदे भारत
वंदेभारत ही देशाची पहिली सेमी हायस्पीड ट्रेन आहे. ही ट्रेन इंजिन लेस असल्याने इंजिन बदल्याचा त्रासातून मुक्ती झालेली आहे. आता दहा नवीन वंदेभारतना पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंड राज्यातील जमशेदपूरहून हिरवा झेंडा दाखविणार आहेत. आता पर्यंत झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, ओदीशा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगाना, कर्नाटक, छत्तीसगढ़ आणि उत्तर प्रदेश या राज्यांना वंदेभारत एक्सप्रेस मिळाल्या आहेत.
आता नवीन वंदेभारतपैकी बहुतांशी वंदेभारत या बिहारवरुन जाणार आहेत. येत्या काही दिवसात झारखंड राज्यात विधानसभेच्या निवडणूका आहेत. त्यामुळे पंतप्रधान येत्या 15 सप्टेंबर रोजी जमशेदपूरला पोहचणार आहेत. 15 सप्टेंबर रोजी किमान तीन आणखी वंदे भारत एक्सप्रेस ओदीशा राज्यातून जाणार असल्याचे ईस्ट कोस्ट रेल्वेने म्हटले आहे.
ओदीशा मिळणार 3 नवीन वंदे भारत
ओदीशाहून सुटणाऱ्या तीन नवीन वंदेभारत टाटा-बरहामपुर, राऊरकेला-हावडा आणि दुर्ग-विशाखापट्टनम अशा आहेत. या दहा वंदेभारत ट्रेन पैकी असून पंतप्रधान त्यांचे उद्घाटन करणार आहेत. ओदिशातील पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी केंद्राने साल 2024-25च्या अर्थसंकल्पात 10,586 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
