Explore

Search

April 8, 2025 12:33 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

South Movie : ‘देवरा पार्ट 1’ ट्रेलर आऊट

ज्युनिअर एनटीआर आणि सैफ अली खानमध्ये जबरदस्त फेस ऑफ

ज्युनिअर एनटीआर  आणि सैफ अली खानच्या  ‘देवरा पार्ट चं बहुप्रतिक्षित ट्रेलर रिलीज झालं आहे. काही मिनिटांच्या या ट्रेलरने चाहत्यांना खिळवून ठेवलं आहे. सैफ आणि ज्युनिअर एटीआर यांच्यातील फेस ऑफचे दृष्य आणि इतर बरेच सीन्स अंगावर काटा आणणारे आहेत. तसंच जान्हवी कपूर, प्रकाश राज आणि मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठेचीही झलक यामध्ये पाहायला मिळत आहे.

देवरा पार्ट १ च्या ट्रेलरने सोशल मीडियावर काही वेळातच धुमाकूळ घातला आहे. मुंबईत नुकताच सिनेमाचा ट्रेलर लाँच पार पडला. यावेळी सिनेमातील कलाकार आणि क्रू सहभागी होते. २ मिनिट ३९ सेकंदाच्या या ट्रेलरने सर्वांना खिळवून ठेवले. रक्तपात आणि अॅक्शन सीन्सने भरलेला असा हा सिनेमा आहे. ज्युनिअर एनटीआर आणि सैफ अली खान एकमेकांना भिडतानाचे दृश्य अंगावर काटा आणणारे आहेत. देवराच्या भूमिकेत ज्युनिअर एनटीआर आहे. त्याची एन्ट्रीही दमदार आहे. तर सैफही एकदम खलनायकाच्या भूमिकेत आश्वासक दिसत आहे. जान्हवी कपूरच्या भूमिकेनेही उत्सुकता वाढवली आहे. सिनेमात ज्युनिअर एनटीआरची दुहेरी भूमिका आहे.

देवरा पार्ट १  २७ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठेलाही काही सेकंदासाठी ट्रेलरमध्ये स्थान आहे. तिच्या भूमिकेबद्दलही आता उत्सुकता आहे. देवराच्या ट्रेलरने एकूणच सिनेमाची आतुरता वाढवली आहे. कोरतला शिवा यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy