Explore

Search

April 12, 2025 8:15 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Asian Champions Trophy : हॉकी इंडियाचा विजयी चौकार

दक्षिण कोरियला 3-1 ने चारली पराभवाची धूळ

गतविजेत्या भारतीय संघाची एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 स्पर्धेत जबरदस्त कामगिरी सुरु आहे. एकापाठोपाठ एक सामने जिंकत विजयी चौकार मारला आहे. रॉबिन राउंड फेरीत टीम इंडियाने दक्षिण अफ्रिकेला पराभवाची धूळ चारली आहे. दक्षिण अफ्रिकेला 3-1 पराभूत करत उपांत्य फेरीतील स्थान पक्कं केलं आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कर्णधार हरमनप्रीत सिंहने 2 गोल, तर अरिजीत सिंह हुंडलने एक गोल केला. हरमनप्रीतचे दोन्ही गोल पेनल्टी कॉर्नरवरून आले. तर अरिजीतने फिल्ड गोल मारला. भारताकडून पहिल्या सत्राच्या आठव्या मिनिटाला अरिजीत सिंह हुंडलन गोल मारत खातं खोललं. त्यानंतर पुढच्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि कर्णधार हरमनप्रीत सिंहने त्या संधीचं सोनं केलं. पहिल्या सत्रात भारताकडे 2-0 ने आघाडी होती. त्यामुळे बरोबरी साधण्यासाठी दक्षिण अफ्रिकेची धडपड सुरु होती. दुसऱ्या सत्राच्या शेवटच्या मिनिटाला कोरियाच्या यांगने गोल मारला. तर तिसऱ्या सत्रात हरमनप्रीतने एक आणखी गोल मारला आणि सामना 3-1 असा आणला. शेवटपर्यंत अशीच स्थिती राहिली आणि भारताने हा सामना जिंकला.

भारताने पहिल्या सामन्यात यजमान चीनचा धुव्वा उडवला होता. चीनला 3-0 ने पराभूत करत विजयी सलामी दिली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात जापानला 5-1 ने पराभूत केलं. तिसऱ्या सामन्यात मलेशियाला 8-1 पराभूत केलं. या विजयानंतर टीम इंडिया टॉपला आहे. तसेच उपांत्य फेरीचं गणित सुटलं आहे. दुसरीकडे, भारत आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेला पाकिस्तान संघ आमनेसामने येणार आहे. हा सामना 14 सप्टेंबरला होणार आहे. या सामन्याकडे क्रीडाप्रेमींच्या नजरा खिळल्या आहेत. दरम्यान, पाकिस्तानची हॉकीची स्थिती नाजूक आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत क्वॉलिफाय झाली नव्हती.

भारताचा कर्णधार हरमनप्रीत 5 गोलसह सर्वाधिक गोल मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत टॉपला आहे. तर कोरियाचा यांग जिहुन यानेही पाच गोल मारले आहेत पण दुसऱ्या स्थानावर आहे. तर भारताचा अरिजीत सिंह हुंडल हा 4 गोलसह चौथ्या स्थानावर आहे. या स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना शनिवारी होणार आहे. तर अंतिम सामना रविवारी होईल.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy