Explore

Search

April 8, 2025 12:33 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Bollywood News : शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट जपानमध्ये होणार प्रदर्शित

अभिनेता शाहरुख खानने 2023 मध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्याच्या ‘पठाण’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. भारतीय सुपरस्टार कलाकारांमध्ये शाहरुखचा मान उंचावणारा चित्रपट म्हणजे ‘जवान’ हा आहे.

जगभरात 1100 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या या चित्रपटाने शाहरुखला अशा अवतारात सादर केले ज्यामध्ये तो कधीही पडद्यावर दिसला नव्हता. शाहरुखच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा आणि आयकॉनिक चित्रपटांपैकी एक असलेला ‘जवान’ आता नवा धमाका करण्यास सज्ज झाला आहे.

जवान’ चित्रपट जपानमध्ये प्रदर्शित होणार 

अभिनेता शाहरुख खानने सोशल मीडियावर त्याच्या अधिकृत हँडलवरून ही माहिती दिली आणि त्याच्या ‘जवान’चे जपानी पोस्टर देखील शेअर केले. हा चित्रपट नोव्हेंबरमध्ये जपानमधील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खानने ही पोस्टर शेअर करताना म्हटलं आहे की, ‘ एक कथा न्यायाची … सूडाची… खलनायक आणि नायकाची… तरुणांची कहाणी… जपानमधील थिएटरमध्ये पहिल्यांदाच येत आहे! तर आता फक्त एकच प्रश्न उरला आहे – तयार आहात ?? तुम्हा सर्वांना खूप आवडलेली आग आणि कृती… जपानमध्ये त्याचे मोठ्या प्रमाणावर आगमन होत आहे! ‘जवान’ 29 नोव्हेंबर 2024 रोजी जपानच्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

जपानमध्ये सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड चित्रपट 

जपानमध्ये सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड चित्रपट आमिर खानचा ‘3 इडियट्स’ आहे. या चित्रपटाने 17 कोटी जपानी येन म्हणजे (सुमारे 10 कोटी भारतीय रुपये) कमाई केली होती. जपानमधील सर्वात मोठा भारतीय चित्रपट म्हणजे जूनियर NTR आणि राम चरणचा ‘RRR’ आहे. ज्याने 234 कोटी जपानी येन म्हणजेच (सुमारे 138 कोटी भारतीय रुपये) कमावले होते.

जवान’च्या आधी ‘पठाण’ चित्रपट जपानमध्ये झाला होता रिलीज

शाहरुखचा 2023 चा ब्लॉकबस्टर ‘पठाण’ चित्रपट जपानमधील थिएटरमध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाला जपानमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिस धुमाकूळ घातला होता. रिपोर्टनुसार, शाहरुखचा ‘पठाण’ हा भारतीय चित्रपट होता ज्याने पहिल्या वीकेंडमध्ये जपानमधील चित्रपटगृहांमधून सर्वाधिक कमाई केली होती.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy