Explore

Search

April 19, 2025 2:54 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Crime News : कराड परिसरातील गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेले 92 जण हद्दपार

कराड : सध्या महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव मोठया प्रमाणात उत्साहाने साजरा होत आहे. कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील सार्वजनिक सण, उत्सवा दरम्यान गोंधळ करुन कायदा व सुव्यवस्था निर्माण करणाऱ्या तसेच पोलीस अभिलेखावरील गुन्हे असलेले संशयित आरोपी यांचे गणेशात्सवा दरम्यान कराड पोलीस ठाणे हद्दीत येणेस मज्जाव करणेकरीता उपविभागीय दंडाधिकारी कराड विभाग कराड यांचेकडे प्रस्ताव सादर करणेत आले होते. या प्रस्तावास मंजुरी मिळाली असून तब्बल 92 जणांना हद्दपार करण्यात आले आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत व कायदा व सुव्यवस्थेत पार पाडणेसाठी कराड शहर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार यांनी रेकॉर्डवरील लोकांचे अभिलेख पडताळुन त्यांचेवर गणेशोत्सवात योग्य व कडक प्रतिबंधक कारवाई होणेसाठी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविले होते. गुन्हेगारी क्षेत्रातील माहीर आरोपीतांवर बीएनएनएस कलम 163 (२) प्रमाणे पाठविले प्रस्तावांची चौकशी होवुन उपविभागीय दंडाधिकारी कराड विभाग कराड यांनी गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेल्या आरोपींना गणेशोत्सवाचे अंतिम चरणामध्ये कराड शहर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रामध्ये प्रवेश व वास्तव्यबंदी केलेली आहे. याबाबतचे आदेश दि. 13. सप्टेंबर रोजी प्राप्त झाल्यानंतर त्या आदेशांची कराड शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड यांचे पथकाने बजावणी संबंधीतांना करुन 92 जणांना कराड शहर पोलीस ठाण्याची हद्द सोडण्याचे फर्मान काढले आहे. तसेच बीएनएनएस कलम 168 प्रमाणे 307, बीएनएनएस कलम 126 प्रमाणे 50, बीएनएनएस कलम 128 प्रमाणे 28, बीएनएनएस कलम 129 प्रमाणे 05, प्रोव्ही 93 प्रमाणे 10 प्रमाणे महाराष्ट्रात पोलीस अधिनियम कलम 142 प्रमाणे 02 जणावर सार्वजनिक गणेशोत्सव अनुषंगाने प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.
हद्दपार करण्यात आलेल्या इसमांनी हदृपार कालावधीमध्ये उपविभागीय दंडाधिकारी कराड विभाग कराड अथवा कराड शहर पोलीस ठाणेचे प्रभारी वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांचे परवानगीशिवाय प्रवेश करु नये. हद्दपार इसमाने विनापरवाना कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत प्रवेश केल्यास किंवा हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्यास अशा हदृपार व्यक्तींवर कराड शहर पोलीस ठाण्याकडुन प्रचलीत कायदयान्वये कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy