भारताकडून तीव्र निषेध
अमेरिकेत पुन्हा एकदा हिंदू मंदिराला लक्ष्य करण्यात आले आहे. न्यूयॉर्कच्या मेलविले परिसरातील बीएपीएस स्वामीनारायण मंदिरात समाजकंटकांनी मंदिराचे नुकसान केले आहे. न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने हे प्रकरण अमेरिकन प्रशासनासमोर मांडले आहे. दूतावासने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. भारतीय दूतावासाने या कृत्यात सहभागी असलेल्या गुन्हेगारांवर तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
काय आहे प्रकरण?
सोशल मीडियावर आलेल्या फुटेजनुसार, मेलविले मध्ये हिंदू मंदिराबाहेरील रस्त्यावर आणि प्रतिक चिंन्हांवर स्प्रे पेंटने आपत्तीजनक शब्द लिहिण्यात आले आहेत. अमेरिकन फाउंडेशनने या प्रकरणी न्याय विभागाने आणि गृह सुरक्षा विभागाने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
दूतावासाने तीव्र आक्षेप व्यक्त केला
या संपूर्ण प्रकरणाबाबत न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने सोमवारी X पोस्ट केली आहे. दूतावासाने म्हटले आहे की, न्यूयॉर्कमधील मेलव्हिल येथील BAPS स्वामीनारायण मंदिराजवळील साइन बोर्डची विद्रुपीकरणाची घटना अस्वीकार्य आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, वाणिज्य दूतावास “समुदायाच्या संपर्कात आहे आणि या घृणास्पद कृत्याच्या गुन्हेगारांवर त्वरित कारवाई करण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींच्या अधिकाऱ्यांकडे हे प्रकरण उचलले आहे.”
या भागात पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे
मेलविले हे स्फोल्क काउंटी, लाँग आयलंडमध्ये स्थित आहे आणि नासाऊ वेटरन्स मेमोरियल कोलिझियमपासून सुमारे 28 किलोमीटर अंतरावर आहे, जेथे 22 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी एका समुदायिक कार्यक्रमात संबोधित करणार आहेत.
