2025 मध्ये रिलीज होणार चित्रपट!
बॉलिवूड स्टार रणवीर सिंग आता नुकताच बाबा झाला आहे. सध्या रणवीर सिंग आपला सर्व वेळ आपल्या मुलीला देत आहे. रणवीर सिंग लवकरच त्याच्या कामावर परतण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रणवीर सिंग भविष्यात फरहान अख्तरच्या बहुप्रतिक्षित चित्रपट डॉन 3 चे शूटिंग सुरू करणार आहे. काही काळापूर्वी फरहान अख्तरने टीझर शेअर करून डॉन 3 ची घोषणा केली होती. तेव्हापासून चाहते डॉन 3 चे शूटिंग सुरू होण्याची वाट पाहत आहेत. मात्र, रणवीर सिंग या चित्रपटावर अद्याप काम सुरू करू शकलेला नाही. तसेच, फरहान अख्तरने 120 बहादूर या चित्रपटामुळे डॉन 3 चे शूटिंग सुरू होत नाहीये असे देखील सांगितले होते. दरम्यान, डॉन ३ संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे.
दिग्दर्शक आणि कलाकार आहेत व्यस्त
मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर रणवीर सिंग पुढच्या वर्षी डॉन 3 च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. पुढील वर्षी मार्च 2025 मध्ये रणवीर सिंग आणि कियारा अडवाणी डॉन 3 वर काम सुरू करणार आहेत. कियारा अडवाणी सध्या हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरचा चित्रपट वॉर २ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. रणवीर सिंग आदित्य धरच्या पुढच्या चित्रपटात काम करत आहे. एकूणच, रणवीर सिंग, फरहान अख्तर आणि कियारा अडवाणी यांच्याकडे सध्या शॉटिंगसाठी वेळ नसल्यामुळे या चित्रपटाचे शॉटिंग तात्काळ थांबले आहे.
जानेवारीमध्ये होणार डॉन ३ चे शूटिंग सुरु
फरहान अख्तर पुढील वर्षी जानेवारीपासून डॉन ३ चे शूटिंग सुरू करणार आहे. रणवीर सिंग आणि कियारा अडवाणी मार्चपर्यंत डॉन ३ च्या टीममध्ये सामील होणार आहेत. डॉन 3 चे शूटिंग मे-जून पर्यंत पूर्ण होईल असे सांगितले जात आहे कारण फरहान अख्तर 2025 मध्येच डॉन 3 रिलीज करण्याचा विचार करत आहे. ही बातमी रणवीर सिंगच्या चाहत्यांना नक्कीच खूश करेल. डॉन 3 मध्ये एक वेगळीच स्टाईल पाहायला मिळणार असल्याचे मानले जात आहे. रणवीर या अवतारात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
