Explore

Search

April 12, 2025 8:44 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Israel and Hamas : अमेरिकेचे तिन्ही सैन्य दल इस्रायलच्या रक्षणासाठी सज्ज

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध आता इतर देशांपर्यंत पोहोचलं आहे. इस्रायलच्या विरोधात आता अनेक मुस्लीम देश उभे राहिले आहे. पण इस्रायल देखील आपल्यावरील हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीये. नुकताच इस्रायलने लेबनॉनमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाहच्या सैनिकांना लक्ष्य केले आहे. हिजबुल्लाहचे सैनिक संवाद साधण्यासाठी पेजरचा वापर करायचे. इस्रायलने पेजर हॅक करत त्यामध्ये स्फोट घडवून आणले. त्यामुळे अनेक सैनिक जखमी झाले. तर 12 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलच्या चारही बाजुने त्याच्यावर दबाव आहे. त्यामुळे अमेरिकेने जवळपास वर्षभरापासून मध्यपूर्वेतील आपली लष्करी उपस्थिती वाढवली आहे. अमेरिकेने अंदाजे 40 हजार सैनिक, डझनभर युद्धनौका आणि हवाई दलाचे चार फायटर जेट स्क्वॉड्रन तैनात केले आहेत. यामुळे अमेरिका आपल्या मित्र राष्ट्रांवरील हल्ले थांबवू शकेल.

इस्रायलच्या मदतीसाठी अमेरिकेचे सैन्य

इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातील तणावामुळे जगभरात चिंता वाढली आहे. या संघर्षाचे रूपांतर युद्धात होण्याची शक्यता आहे. इस्रायलवर हमासने हल्ला केल्यानंतर इस्रायल हमासविरुद्ध वर्ष भरापासून टार्गेट करत आहे. आता पेजर हल्ल्यानंतर हिजबुल्लाने म्हटले आहे की, इस्रायलने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.

मध्यपूर्वेत आधीच मोठ्या संख्येने अमेरिकन सैन्य उपस्थित आहे. त्यामुळे जर इस्रायलवर हल्ला झाला तर लगेचच अमेरिकेकडून त्यांना मदत दिली जाऊ शकते. संपूर्ण मध्यपूर्वेत यूएस सेंट्रल कमांडमध्ये साधारणपणे 34,000 यूएस सैनिक तैनात असतात. इस्रायल-हमास युद्धाच्या सुरुवातीच्या महिन्यांत अतिरिक्त जहाजे आणि विमाने पाठवल्यामुळे सैन्यांची संख्या अंदाजे 40,000 पर्यंत पोहोचली आहे. आता ही संख्या 50 हजारांवर जाणार आहे.

नौदलाची ताकद ही वाढवली

मध्य पूर्वेत अमेरिकेचे नौदलची ही ताकद वाढवली आहे. अमेरिकेने विमानवाहू नौका या ठिकाणी तैनात केल्या आहेत. अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी गेल्या वर्षभरात अनेक वेळा विमानवाहू नौकांची तैनाती वाढवली आहे. दोन विमानवाहू युद्धनौका इस्रायलसाठी त्यांनी तैनात केल्या आहेत. इराणला रोखण्यासाठी लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रे तयार ठेवण्यात आली आहेत. असे अनेकवेळा अमेरिकन लष्करी कमांडर यांनी सांगितले आहे. अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका USS अब्राहम लिंकन आणि तिची तीन विनाशिका ओमानच्या आखातात तैनात आहेत. अमेरिकन लष्कराची दोन जहाजे लाल समुद्रात आहेत. या परिसरात पाणबुडीही तैनात आहेत. पूर्व भूमध्य समुद्रात अमेरिकेच्या सहा युद्धनौका आहेत.

हवाई दलही तैनात

अमेरिकेच्या वायुसेनेने गेल्या महिन्यात येथे F-22 लढाऊ विमानांचा अतिरिक्त स्क्वॉड्रन पाठवला आहे. ज्यामुळे मध्य पूर्वेतील जमिनीवर आधारित स्क्वॉड्रनची एकूण संख्या चार झाली. त्यात A-10 थंडरबोल्ट II ग्राउंड अटॅक एअरक्राफ्ट, F-15E स्ट्राइक ईगल्स आणि F-16 लढाऊ विमानांचा स्क्वाड्रन देखील आहे. ही विमाने कोणत्या देशांची आहेत हे हवाई दलाने सांगितले नाही. F-22 लढाऊ विमान रडारवर दिसणे अवघड असल्याने अमेरिकन सैन्याला मोठी ताकद मिळते.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy