Explore

Search

April 13, 2025 11:04 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Health : सर्दी, शिंकांनी त्रस्त

तर करा हे घरगुती उपाय, लगेच मिळेल आराम

सर्दी एक कॉमन हेल्थ प्रॉब्लेम आहे. सर्दी कधीही, कुठेही, कोणालाही होऊ शकते. बदलतं हवामान, धुळ, मातीची एलर्जी यामागच कारण आहे. कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती हे सुद्धा यामागच कारण आहे. वातावरणात थंडावा वाढल्यानंतर काही लोकांना शिंकांचा त्रास सुरु होतो. त्यामुळे खूप त्रास होतो. काही असे घरगुती उपाय आहेत, त्यामुळे शिंकांपासून तात्काळ आराम मिळू शकतो. या उपायांमुळे शिंकांचा त्रास कमी होतोच पण सर्दीच्या लक्षणापासूनही आराम मिळतो.

वारंवार शिंका येत असतील, तर यामागे एलर्जी सुद्धा एक कारण असू शकतं. जास्तवेळ एसीमध्ये राहिल्यास ड्राय नोजचा त्रास होतो. त्यामुळे वारंवार शिंका येते. सध्या काही असे घरगुती उपया जाणून घेऊया, ज्यामुळे सर्दी आणि शिंकांच्या त्रासापासून मुक्ती मिळू शकते.

पहिला उपाय : वारंवार शिंका येत असतील किंवा सर्दी झाली तर रात्री झोपण्याआधी वाफ घ्या. सर्दीमुळे नाक कधीकधी सुजतं. गरम पाण्याच्या वाफेमुळे त्रास कमी होतो. सायनसमुळे जमा झालेला कफही निघून जातो. गरम पाण्यात लवंग, लसूनच्या पाकळ्य, मीठ टाका. कारण त्यात एंटी बॅक्टेरियल गुण असतात.

दुसरा उपाय : डाएटमध्ये हळदी दूधाचा समावेश कार, रोज रात्री कोमट दूधात अर्धा चमचा हळदी टाकून सेवन करा, त्यामुळे सुद्धा शिंकेचा त्रास कमी होईल. दूधातील एंटीऑक्सीडेंट सर्दी-शिंकापासून बचाव करतात. त्याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे तुम्ही व्हायरल आजारांपासून स्वत:चा बचाव करु शकता.

तिसरा उपाय : पाणी उकळवा त्यात आल्याची पूड टाका. त्यात मध मिसळून ते पाणी प्या सर्दी आणि शिंकापासून तुम्हाला मोठा दिलासा मिळेल. आलं आणि गुळाच्या सेवनामुळे सुद्धा सर्दीच्या त्रासापासून सुटका होऊ शकते. आलं कुटून त्याचा रस काढा. त्यात गूळ मिसळून सेवन करा. दिवसात दोनवेळा असं करा, आराम मिळेल.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy