३ जवान शहीद
श्रीनगर : जम्मू काश्मीर राज्यातील बडगाम येथे एक मोठा अपघात घडला आहे. सुरक्षा दलाच्या एका बसला हा अपघात घडला आहे. सीमा सुरक्षा दल (BSF) जवानांच्या बसला अपघात झाला आहे. बीएसएफ जवानांची एक बस बडगाम येथे दरीत कोसळली आहे. या दुर्घटनेमध्ये अनेक जवान जखमी झाले आहेत. या बसमधून ३५ बीएसएफचे जवान प्रवास करत होते. बडगाम येथे ही बस दरीत कोसळी असून, यात अनेक जवान जखमी झाले आहेत.
उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, बीएसएफची बस बडगाम येथील ब्रील गावात खोल दरीत कोसळली आहे. या बसमधून ३५ बीएसएफ जवान प्रवास करत होते. या दुर्घटनेत बीएसएफचे ३ जवान शहीद झाले आहेत. तर अनेक जवान जखमी झाले आहेत. सर्व जखमी बीएसएफ जवानांना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. लवकरच दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेच्या सुरक्षेसाठी जात असताना बीएसएफच्या जवानांची ही बस बडगाम जिल्ह्यात खोल दरीत कोसळली आहे. या दुर्घटनेत १२ पेक्षा अधिक जवान जखमी झाले आहेत. अनेक जवानांची प्रकृती गंभीर असल्याचे बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
