Explore

Search

April 13, 2025 11:13 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Mumbai : वाहनांच्या ‘हेडलाईट’मध्ये नियमबाह्य बदल करणार्‍यांवर कारवाई

राज्यातील सर्व परिवहन अधिकार्‍यांना आयुक्तांचे आदेश!

मुंबई : वाहनांच्या हेटलाईटची प्रकाशकिरणे कशी असावीत ? याविषयी ‘केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९’ अंतर्गत मानके निश्चित करण्यात आली आहेत. याला डावलून काही वाहनचालक गाड्यांच्या हेटलाईटमध्ये डोळ्यांना त्रासदायक लाईट बसतात. त्यामधील त्रासदायक प्रकाशकिरणांमुळे राज्यात अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. यात काहीजणांना स्वत:चा प्राणही गमवावा लागला. सुराज्य अभियानाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याच्या परिवहन आयुक्तांकडे तक्रार केली होती. याची नोंद घेऊन २३ ऑगस्ट या दिवशी परिवहन आयुक्तांनी या प्रकरणी कारवाई करून अहवाल सादर करण्याचा आदेश राज्यातील सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांना दिला आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’चे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री. अभिषेक मुरुकटे यांनी दिली आहे.

वाहन चालवतांना चालकाचे डोळे समोरील वाहनाच्या हेडलाईटच्या प्रकाशकिरणांमुळे दीपले जाऊ नयेत, यासाठी ‘केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९’च्या अंतर्गत केंद्रशासनाने वर्ष २००५ मध्ये सुरक्षा मानकांमध्ये आवश्यक सुधारणा केल्या आहेत. प्रत्यक्षात यानुसार कार्यवाही होत नसल्याचे सुराज्य अभियानाच्या लक्षात आल्यामुळे परिवहन आयुक्तांकडे याविषयी तक्रार केली होती. या तक्रारीवरून परिवहन आयुक्तांनी आदेश दिले आहेत. हेडलाईटमध्ये नियमबाह्य पालट करणार्‍या वाहनांची पडताळणी करून दोषी वाहनचालकांवर कारवाई करावी, तसेच याविषयी जनजागृती करावी, असेही परिवहन आयुक्तांनी परिपत्रकाद्वारे राज्यातील सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक अधिकार्‍यांना कळवले आहे, असे मुरुकटे म्हणाले.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy