Explore

Search

April 12, 2025 7:49 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

IND vs BAN :  कसोटीत रिषभ पंतचा दमदार कमबॅक

शुभमन गिलनेही ठोकलं शतक!

भारत बांग्लादेश यांच्यामधील सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजीनी मैदानावर कहर केला आहे. पहिल्या इनिंगमध्ये रविचंद्रन अश्विनने शतक ठोकळ. रविचंद्रन अश्विनने १३३ चेंडूंमध्ये ११३ धावांची खेळी खेळली तर रवींद्र जडेजाने सुद्धा ८६ धावांची महत्वाचा खेळ संघासाठी खेळला. दुसऱ्या इनिंगची भारतीय संघाची कालपासून फलंदाजी सुरु झाली आहे. सामन्यात रिषभ पंतने दमदार कामगिरी करत त्याच्या झालेल्या अपघातानंतर त्याने अविश्वनीय कामगिरी करत शतक ठोकल आहे. रिषभ पंतने १२८ चेंडूंमध्ये १०९ धावा केल्या आहेत. त्यानंतर त्याने त्याची विकेट गमावली. त्याने आपल्या खेळीत 13 चौकार आणि 4 षटकार मारले. या शानदार शतकानंतर ऋषभ पंत मेहदी हसन मिराजच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.

शुभमन गिलने दमदार कामगिरी करत बांगलादेशविरुद्ध चेन्नई कसोटीत शतक झळकावले. टीम इंडियासाठी गिलचे हे पाचवे कसोटी शतक आहे. चेन्नई कसोटीच्या पहिल्या डावात त्याला विशेष काही करता आले नाही. पण दुसऱ्या डावात दमदार कामगिरी केली. गिलच्या आधी ऋषभ पंतनेही शतक झळकावले. वृत्त लिहेपर्यंत शुभमन गिलने १६५ चेंडूंचा सामना करत १०६ धावा केल्या होत्या. त्याने १० चौकार आणि ३ षटकार मारले.

टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. या काळात त्यांनी दमदार कामगिरी केली. गिलने ऋषभ पंतसोबत शतकी भागीदारीही केली. मात्र यानंतर पंत बाद झाला. वृत्त लिहेपर्यंत गिलने १०६ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात भारताने ६१ षटकांत ४ गडी गमावून २६३ धावा केल्या. गिलने आतापर्यंत १२ आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत. त्याने कसोटीत ५ शतके झळकावली आहेत. त्याने एकदिवसीय सामन्यात ६ शतके आणि T२० आंतरराष्ट्रीय सामन्यात एक शतक झळकावले आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy