Explore

Search

April 13, 2025 11:03 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Ratnagiri News : महाराणी येसूबाई स्फूर्तीस्थळासाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना साकडे

प्रकल्पाचा प्रस्ताव थेट महसूल मंत्र्यांच्या टेबलावर

रत्नागिरी : मौजे शृंगारपूर जिल्हा रत्नागिरी येथील स्वराज्याच्या कुल मुखत्यार महाराणी येसूबाई यांच्या स्फूर्ती स्थळासाठी साताऱ्याचे माजी उपनगराध्यक्ष  कोकणचे सुपुत्र सुहास राजेशिर्के यांचा अखंड पाठपुरावा सुरू आहे. कोकण विभागीय आयुक्तांच्या मार्फत हा प्रस्ताव राज्याचे महसूल व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या टेबलावर पोहोचला आहे. तसेच या स्फूर्ती स्थळासाठी मुबलक निधी उपलब्ध व्हावा याकरिता सुहास राजेशिर्के यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची चिपळूण येथे जनसंवाद यात्रेदरम्यान भेट घेतली, आणि या मागणीचे निवेदन त्यांना सादर केले.  यावेळी चिपळूणचे आमदार शेखर निकम, शृंगारपूरचे सरपंच विनोद भिकाजी पवार व अभिषेक ढसाळे इत्यादी उपस्थित होते.

साताऱ्याचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांचा येसूबाईंच्या स्फूर्ती स्थळासाठी पाठपुरावा सुरू आहे. त्यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. प्रशासनाने त्यांच्या मागणीची दखल घेऊन हा प्रस्ताव कोकण विभाग आयुक्तांकडे पाठवला आहे. तेथून तो प्रस्ताव राज्याचे महसूल व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पोहोचला आहे. प्राप्त मागणीनुसार मौजे शृंगारपूर येथील सर्वे नंबर 142 येथील जागा ग्रामपंचायत मालकीची असून येथे सातबारा दप्तरी सरकारी गोठण अशी नोंद आहे. या जागेपैकी 40 बाय 30 इतकी जागा स्वराज्याच्या कुल मुखत्यार महाराणी येसूबाई यांच्या स्मारकासाठी आवश्यक आहे. स्मारका नंतरही या जागेची मालकी शृंगारपूर ग्रामपंचायतीकडे राहणार आहे. सध्या या ठिकाणी एक चौथरा बांधण्यात आला असून, त्याला महाराणी येसूबाई संभाजीराजे भोसले असे नाव देण्यात आले आहे. येथूनच जवळ ऐतिहासिक प्रचित गड असून शृंगारपूर आणि प्रचित गड हा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होण्यासाठी वाव आहे. त्याकरिता शृंगारपूर येथील नियोजित स्थळी मोठे स्फूर्ती स्थळ होणे आवश्यक असल्याची येथील ग्रामस्थांची भावना आहे.

या संदर्भात साताऱ्याचे माजी उपनगराध्यक्ष, कोकणचे सुपुत्र सुहास राजेशिर्के यांनी पुढाकार घेऊन हा विषय मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. दोन दिवसांपूर्वी सुहास राजेशिर्के यांनी मंत्रालयात अजितदादा पवार यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन सादर केले. स्फूर्ती स्थळासाठी वित्त विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy