Explore

Search

April 13, 2025 10:33 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : डॉ.होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीवर नियुक्ती प्रकरणी अमित कुलकर्णी यांचा विशेष सत्कार

सातारा : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत महाराष्ट्र राज्य शासनाने गठीत केलेल्या डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी मुंबईच्या व्यवस्थापन परिषदेवर नियुक्ती झाल्याबद्दल सातारा येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल साताराच्या शालेय समितीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांचा शालामाऊली  तर्फे विशेष सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, माऊली ब्लड बँकेचे मार्गदर्शक व ज्येष्ठ रक्तदाते अजित कुबेर, सातारचे सुप्रसिद्ध धन्वंतरी डॉ. गिरीश पेंढारकर, शालेय समितीचे सदस्य सारंग कोल्हापुरे, शालाप्रमुख सौ सुजाता पाटील, माऊली ब्लड बँकेचे माधव प्रभुणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगीराज वारले, पालक संघाच्या अध्यक्ष सौ. ठोंबरे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

मान्यवरांच्या हस्ते दीप प्रजल प्रज्वलन व सरस्वती देवीचे पूजन झाल्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक  शालाप्रमुख सौ.सुजाता पाटील यांनी केले. याप्रसंगी बोलताना, शाळेच्या वतीने अमित कुलकर्णी सरांची झालेली निवड ही खरोखरच अभिनंदन या गौरवास्पद आहे. आम्ही सरांच्या मार्गदर्शनाखाली शाळेने राबवत असलेल्या विविध उपक्रमांसाठी त्यांची मोलाची मार्गदर्शन व सहकार्याची असलेली सोबत आम्हा सर्वांचे बळ वृद्धिंगत करणारी आहे असे सांगितले.

सर्व मान्यवरांचा सत्कार शालामाऊलीचे वतीने सुजाता पाटील यांनी कंदीपेढे व पुस्तक देऊन केला. यावेळी  मार्गदर्शन करताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे म्हणाले की, न्यू इंग्लिश स्कूलचे नाव सर्व जगात पोहोचलेले आहे. आज देश विदेशात शाळेचे माजी विद्यार्थी आपल्या विजयी  पताका फडकवत आहेत. शाळेच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून विविध उपक्रम सुरू ठेवले आहेत. याचा खरोखरच आनंद वाटतो.

अमित कुलकर्णी सरांची राज्य पातळीवरील परिषदेची झालेली निवड ही खरोखरच सार्थ व अभिनंदनीय अशी आहे. यावेळी बोलताना  अमित कुलकर्णी  म्हणाले की, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचा 14 वर्षांचा अनुभव, डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणेचा दहा वर्षांहून अधिकचा अनुभव यासह आपल्या सर्वांच्या शुभेच्छा व आशीर्वादाने ही जबाबदारी देखील यशस्वीरित्या पार पाडीन, असा आत्मविश्वास वाटतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विचाराचे सुपीक रान व हिंदवी पब्लिक स्कूल रुपी बिज यामुळेच माझ्या आयुष्यात ही ‘शैक्षणिक देवराई’ फुलली आहे. परमेश्वर, आशीर्वाददाते, हितचिंतक यांच्याविषयी हृदयपूर्वक कृतज्ञता  व्यक्त करतो.

शाळा माऊलीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कला दालनातील या सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन श्रीमती. महाडिक मॅडम यांनी केले. या सत्कार सोहळ्याप्रसंगी उपशालाप्रमुख श्रीमती. विनया कुलकर्णी, पर्यवेक्षक राजेश सातपुते, जनार्दन नाईक, अनिता कदम  ज्येष्ठ उद्योजक धनंजय थोरात, प्रभुणे, शाळेचे आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका व पालक संघाचे प्रतिनिधी व सदस्य उपस्थित होते.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy