Explore

Search

April 13, 2025 10:33 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी पती -पत्नीने विषप्राशन करून आत्महत्याचा प्रयत्न

प्रकृती चिंताजनक

लातूर : मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आंतरवली सराटी येथे मागील एक वर्षापासून सहाव्यांदा आमरण उपोषण केले आहे. पण सरकार त्यांच्या उपोषणाला प्रतिसाद देत नसल्याने राज्यभरामध्ये विविध आंदोलने केली जात आहेत. लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरमध्ये ज्ञानोबा तीडोळे आणि पत्नी चंचलाबाई तीडोळे या दोघांनी विषप्राशन करत आत्महत्याचा प्रयत्न केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी ६ वेळा उपोषण केले, मात्र उपोषण करूनही सरकारने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही. तसेच मराठ्यांना आरक्षण दिले नाही, याच नैराश्यातून पती-पत्नीने टोकाचा पाऊल उचलत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान वेळीच त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.

ज्ञानोबा यांना तीन मुले असून मुलगी यंदा अकरावी मध्ये शिकत असून, मुलगा आठवीला व सहावीला आहे. त्यांच्या शिक्षणाची सोय व त्यांच्या भविष्याचे चिंता यातूनच जर आपल्या लेकरांचेच भविष्य अंधारात असेल तर आपण जगून काय फायदा या उद्विगनेतून आणि सरकारच्या उदासिनतेमुळे त्यांनी हा चुकीचा निर्णय घेतला अशी माहिती मिळत आहे. काल मनोज जरांगे यांनी उपोषण सोडले असून आपण आरक्षणासाठी लढतच राहणार असा इशारा दिला.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy