Explore

Search

April 12, 2025 8:42 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : नागठाणे महाविद्यालयाच्या ‘पॉझिटिव्ह’ एकांकिकेचा युवा महोत्सवात डंका

सातारा : डी.पी भोसले महाविद्यालय कोरेगाव येथे शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचा  ४४ वा सातारा जिल्हा स्तरीय युवा महोत्सव नुकताच संपन्न झाला. यामध्ये श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज नागठाणे या महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागातील कलाकारांनी सादर केलेल्या पॉझिटिव्ह या एकांकिकेने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावून युवा महोत्सवामध्ये आपला डंका पिटवला.

युवा महोत्सव म्हणजे तरुणाईच्या उत्साहाला उधाण आणणारी स्पर्धा. या महोत्सवात विविध कला प्रकारामध्ये कलाकार आपली कला सादर करत असतात.

यातीलच मराठी नाटकांना उभारी देणारा एक सहज आणि सशक्त एक कलाप्रकार म्हणजे एकांकिका. युवा पिढीची नाट्य विषयातील रुची आणि गती  वाढवत समाजातील दुःख आणि वेदना एकांकिकेच्या माध्यमातून मांडणारे आणि ग्रामीण भागातील कलाकारांना अभिनयाची आवड निर्माण करून देणारे कोरी पाटीचे दिग्दर्शक नितीन पवार यांनी गेली सलग तीन वर्ष या युवा महोत्सवात फराळ, शहीद आणि आता पॉझिटिव्ह या दर्जेदार एकांकिकांचे सादरीकरण करून प्रेक्षकांना भुरळ पाडली. यावर्षी पॉझिटिव्ह या एकांकिकेने युवा महोत्सवात कमालीचे यश प्राप्त केले आहे.

त्याचबरोबर या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात एकल लोकवाद्य वादन  कलाप्रकारात श्री सौरव चौगुले याचा द्वितीय क्रमांक आला आहे. तसेच भारतीय समूहगीत आणि सुगम गायन कला प्रकारातही उत्तेजनार्थ पारितोषिक मिळून या महाविद्यालयाने पुन्हा एकदा शिवाजी विद्यापीठात आपला  डंका पिटला आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या सातारा जिल्हास्तरीय युवा महोत्सवातील महाविद्यालयाच्या या यशाबद्दल सर्व कलाकारांचे तसेच दिग्दर्शक नितीन पवार,  संगीत दिग्दर्शक दीपक सपकाळ, सहाय्यक वादक, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा.संतोष निलाखे  व सर्व सदस्य यांचे अभिनंदन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्था सचिव प्राचार्या सौ.शुभांगीताई गावडे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे,  विभाग प्रमुख प्राचार्य डॉ.राजेंद्र शेजवळ  यांनी अभिनंदन केले व आजरा महाविद्यालय आजरा येथे होणाऱ्या मध्यवर्ती युवा महोत्सवाच्या सादरीकरणासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy