बांगलादेशच्या 35 षटकांमध्ये 3 बाद 107 धावा
इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. कानपूरमधील ग्रीन पार्क आणि आसपासच्या परिसरात सकाळपासून जोरदार पाऊस होत आहे. पावसामुळे नाणेफेकीला तब्बल 1 तास उशीर झाला. परिणामी सामनाही विलंबाने सुरुवात झाली. सामन्यादरम्यान पावसाने खोडा घातला. पावसाच्या व्यत्ययामुळे बीसीसीआयने अखेर पहिल्या दिवसाचा खेळ संपल्याचं जाहीर केलं. पावसामुळे दिवसातील निर्धारित षटकांचा खेळ होऊ शकला नाही. पहिल्या दिवशी फक्त 3 5षटकांचाच खेळ होऊ शकला आहे. बांगलादेशने 3 विकेट्स गमावून 107 धावा केल्या आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये दरदिवशी 90 षटकांचा खेळ अपेक्षित असतो. मात्र या सामन्यात फक्त 36 षटकांचाच खेळ होऊ शकला. त्यामुळे पहिल्या दिवसाचा 60 टक्के खेळ हा पावसामुळे वाया गेला आहे. पाऊस थांबत नसल्याने नाईलाजाने खेळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची निराशा झाली आहे.
बांगलादेशने पहिल्याच सत्रात 2 विकेट्स गमावल्या. आकाश दीप याने सलामी जोडीला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. आकाशने झाकीरला भोपळाही फोडू दिला नाही. तर शादमन इस्लाम याला 24 धावांवर बाद केलं. बांगलादेशने लंचपर्यंत 2 विकेट्स गमावून 74 धावा केल्या. त्यानंतर बांगलादेशने दुसऱ्या डावात एक विकेट गमावली. कॅप्टन नजमुल शांतो याला 31 धावांवर आर अश्विन याने एलबीडब्ल्यू केलं.
त्यानंतर खराब प्रकाशामुळे दुसऱ्या सत्रातील खेळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे पुढे खेळ होणं अशक्य वाटत असल्याने दिवसाचा खेळ संपल्याचं जाहीर करण्यात आलं. बांगलादेशकडून मोमीनुल हक 40 आणि मुशफिकुर रहीम 6 धावांवर नाबाद परतले आहेत.
