दोन्ही संघाचे खेळाडू हॉटेलमध्ये परतले
भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये २७ सप्टेंबरपासून दुसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. यामध्ये भारताच्या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कालच्या पहिल्या दिनी भारताच्या संघाने ३ विकेट्स घेतले होते, यामध्ये २ विकेट्स आकाशदीप सिंह आणि १ विकेट रविचंद्रन अश्विनच्या नावावर आहे. आज दुसऱ्या दिनाचा खेळ सुरु होणार होता परंतु सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे, त्यामुळे आजच्या दिनाचा खेळ रद्द करण्यात आला आहे अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही संघाचे खेळाडू हे हॉटेलमध्ये परतले आहेत. सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे.
आज सकाळपासून कानपूरमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यामुळे त्याचा परिणाम हा मैदानावर होत आहे. पावसामुळे हैराण झालेली टीम इंडिया हॉटेलमध्ये परतली आहे. भारताला या तीनपैकी आकाशदीपला २ यश मिळाले, तर आर अश्विनला एक विकेट मिळाली. मोमिनुल हकसोबत मुशफिकुर रहीम क्रीजवर आहे. दुसऱ्या दिवशी, चाहत्यांना आशा असेल की हवामान स्वच्छ होईल आणि सामना वेळेवर सुरू होईल. पण दुसऱ्या दिवशीही कानपूरमध्ये पावसाचा अंदाज आहे. आज म्हणजेच २८ सप्टेंबर रोजी कानपूरमध्ये पावसाची ८० टक्के शक्यता आहे.
भारत विरुद्ध बांग्लादेश पहिला कसोटी सामना
भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये भारताच्या संघाने पहिला कसोटी सामना २८० धावांनी जिंकला आहे. त्यामध्ये भारताच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी कमालीची कामगिरी केली. रविचंद्रन अश्विनने पहिल्या इनिंगमध्ये शतक ठोकले तर, दुसऱ्या इनिंगमध्ये रिषभ पंत आणि शुभमन गिल धावांचा पाऊस करून शतक पूर्ण केलं. त्याचबरोबर अश्विन आणि जडेजा या दोघानी दुसऱ्या इनिंगमध्ये बांग्लादेशी फलंदाजांना टिकू दिले नाही, तर आकाशदीपणे सुद्धा कमालीची कामगिरी केली.
